Pune PMPL News: सुट्ट्या पैशांची चिंता मिटली... PMPL बसेसमध्ये सुरू होणार युपीआय पेमेंट सुविधा

UPI Ticket System In PMPL Buses: पुणे शहरातील सर्व बसेसमध्ये युपीआय पेमेंट (UPI Payment) सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
Pune PMPL News
Pune PMPL NewsSaamtv

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune PMPL News: पुणे पीएमपीएलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पीएमपीएलच्या बसेसमध्ये युपीआय पेमेंट म्हणजेच फोन- पे गुगल- पे वरुन तिकीट काढता येईल. पुढील आठवड्यापासून सर्व बसेसमध्ये स्कॅनरची सुविधा बसवण्यात येणार आहे.

Pune PMPL News
Nagpur News: दुध विक्रेत्यांना दणका... नागपुरात दुध भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई; २२५० लिटर दूध केले नष्ट

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बस प्रवास करताना सुट्ट्या पैशांसाठी वाद होणे काही नवीन नाही. आता या सुट्ट्या पैशांच्या टेन्शनमधून पुणेकरांची कायमची सुटका होणार आहे. पुण्यातील पीएमपीएल (PMPL) बसमध्ये पुढील आठवड्यापासून गुगल पे (Phone Pay), फोन पे (Google Pay), पेटीएम (ATM) म्हणजेच युपीआय तिकीट काढण्याची सुविधा सुरु होणार आहे.

सुट्ट्या पैशावरुन वाहक आणि प्रवाश्यांमध्ये वाद होत असल्याचे प्रकार समोर येत होते. तसेच अनेक वाहक सुट्टे पैसे परत करत नसल्याच्या तक्रारीही प्रवाश्यांकडून येत होत्या. त्यामुळेच आता सर्व बसेसमध्ये युपीआय पेमेंट (UPI Payment) सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

पुढील आठवड्यापासून पीएमपीएलच्या सर्व बसेसमध्ये स्कॅनर उपलब्ध होणार आहेत. हे तिकीटाचे पैसे थेट पीएमपीच्या खात्यात जमा होणार होतील. या युपीआय पेमेंट प्रणालीमुळे भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे. (Latest Marathi News)

Pune PMPL News
Maharashtra Politics: चंद्रकांत पाटलांना हटवा अन् अजितदादांना अध्यक्ष करा; मराठा आरक्षणाच्या बैठकीत नेत्यांचा सूर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com