Gopichand Padalkar News: 'रोहित पवार बिनडोक माणूस...' पडळकरांची जहरी टीका, म्हणाले; 'त्यांना मेंढराच्या...'

Gopichand Padalkar On Rohit Pawar: कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे....
Gopichand Padalkar On Rohit Pawar
Gopichand Padalkar On Rohit PawarSaam TV

Pune By Election 2023: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाद पाहायला मिळत आहे. काही दिवसांपुर्वीच आमदार रोहित पवार यांनी "गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय असून ते प्रसिद्धीसाठी पवारांवर टीका करतात, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही," असे विधान केले होते.

रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार हा बिनडोक माणूस असल्याची जहरी टीका केली आहे.

Gopichand Padalkar On Rohit Pawar
Pawan Khera Arrest: खोटं सांगून विमानातून उतरवलं आणि अटक केलं, पवन खेडांच्या अटकेनंतर काँग्रेस आक्रमक

चिंचवड मतदार संघामध्ये अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर पुण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर...

"रोहित पवार हे बिनडोक आहेत. त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बोटे घालण्याची सवय आहे. असा टोला त्यांनी रोहित यांना लगावला आहे. MPSC तरुणांच्या आंदोलनाचे शरद पवार यांना श्रेय घ्यायचे म्हणून ते बैठक घडवून आणत आहेत. प्रत्यक्षात त्यांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडवत आहेत," अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला..

Gopichand Padalkar On Rohit Pawar
Supriya Sule : हा अजितदादा अन् माझ्यावरील अन्याय आहे; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

तसेच यावेळी पुढे बोलताना त्यांनी "रोहित पवार (Rohit Pawar) मेंढराच्या डागनीने डागल तर ते सुधारणार नाहीत. खुरप्याने डागावे लागेल. मग कुठेतरी अक्कल येईल," अशी टीकाही रोहित पवार यांच्यावर केली..

दरम्यान, पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या प्रचाराचे अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे प्रचाराच्या तोफा जोरदार दणाणत आहेत. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील दिग्गज नेतेमंडळी सध्या पुण्यात तळ ठोकून आहेत..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com