Chandni Chowk Bridge Demolished
Chandni Chowk Bridge DemolishedSaam TV

Chandni Chowk Bridge Demolition: ब्लास्ट झाला पण चांदणी चौकातील पूल पुर्णपणे का पडला नाही? मोठं कारण आलं समोर

Chandni Chowk Bridge Demolition Video: आता हा पूल पुर्णपणे जमीनदोस्त झाली नसल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे.

Chandni Chowk Bridge Demolished: वाहतुकीला अडथळा ठरणारा पुण्याच्या चांदणी चौकातील पूल (Bridge) अखेर जमीनदोस्त करण्यात आला आहे. ब्लास्टद्वारे (Blast) अवघ्या 6 सहा सेकंदात हा पूल पाडण्यात आला आहे. मात्र, आता हा पूल पुर्णपणे जमीनदोस्त झाली नसल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. स्फोटात चांदनी चौक ब्रीज पूर्णपणे कोसळला नाही. ब्रिजचा जवळपास ५० % भाग कोसळला आहे. ब्रिजचे पिलर अजूनही साबूत दिसत आहेत. तज्ज्ञ या ब्रिजची पाहणी करत आहेत. एवढं नियोजन करुनही हा पूल पुर्णपणे का पडला नाही याबाबत एक मोठं कारण समोर आलं आहे. (Pune Latest News)

सामटीव्हीने याबाबत या पूलाच्या पाडकामात असलेल्या काही मजूरांबाबत बातचीत केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल, शनिवारी जे ड्रिल घेण्यात आले होते त्यात कालच्या पावसामुळे खूप पाणी गेलं होतं. त्यामुळे ब्लास्ट कमी प्रमाणात झाला आहे. याबाबत अद्यापतरी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र नोएडाचा प्रयोग पुण्यात फसला आहे का अशी कुजबज सुरू झाली आहे. दरम्यान या ब्लास्टाबाबत आणि एकूणच पूलाच्या स्थितीबाबत अभ्यास केला जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com