Pune : पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम लांबणीवर पडणार; जाणून घ्या काय आहे कारण

पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील पूल बुधवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला . पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
pune news
pune newssaam tv

प्राची कुलकर्णी

Pune Chandani Chowk Bridge Demolition News : पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील पूल बुधवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता . पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर पूल १८ सप्टेंबर रोजी पाडण्यात येणार होता. मात्र, पुण्यातील मुसळधार पावसामुळे चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम लांबणीवर पडणार आहे.

pune news
Vedanta foxconn | वेदांताने मुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेले पत्र सामच्या हाती; कंपनीला दिलं होतं 'हे' आश्वासन

पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम पुढे ढकलले आहे. पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर पूल येत्या १८ सप्टेंबर रोजी हा पूल पाडण्यात येणार होता. मात्र, सदर १८ सप्टेंबर रोजी पूल पाडण्याचे काम होणार आहे. मात्र, सततच्या पावसामुळे पूल पाडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. पूल पाडण्याच्या दिवशी वाहतूक वळवली जाईल. या अनुषंगाने याचे मार्ग देखील येत्या २,३ दिवसांत आखले जातील.

पूल नेमका कसा पाडणार ?

पुण्यातील चांदणी चौकातील पूल आता १८ सप्टेंबर नंतर पाडण्यात येणार आहे. सदर पूल पाडण्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रिलींग करण्याचे काम सुरू केले आहे. स्फोटानंतर चांदणी चौकातील पूल हा ९ ते १० सेंकदांमध्ये जमिनदोस्त होणार आहे. तसेच हा पूल पाडण्याठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. याच कंपनीने दिल्लीमधील ट्ववीन टॉवर्स पाडले होते. सदर पूल पाडल्यानंतर त्याजागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

pune news
येत्या रविवारी 'कास पठार' ला जायचा प्लॅन केलाय ?थांबा ! ही बातमी वाचा

दरम्यान, पुणेकरांना चांदणी चौकात वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत होतं. त्यामुळे पुणेकर वाहतूक कोंडीला वैतागले होते. या वाहतूक कोंडीच्या अनेक समस्या मुख्यमंत्र्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. सदर पूल हा १८ सप्टेंबर रोजी पाडण्यात येणार होता. मात्र, सततच्या पावसामुळे चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम लांबणीवर पडणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com