पुण्यात 20 लाख नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित

पुणे शहर (Pune City), पिंपरी चिंचवड (PCMC) आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २० लाख ३३ हजार ३९५ नागरिकांना अद्याप कोरोनाचा पहिला डोससुद्धा मिळू शकला नाहीये.
पुण्यात 20 लाख नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित
पुण्यात 20 लाख नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित Twitter/@mohol_murlidhar

पुणे: पुण्यात अद्याप २० लाख नागरिक लसीकरणापासून (Corona Vaccination) वंचित आहेत. पुणे शहर (Pune City), पिंपरी चिंचवड (PCMC) आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २० लाख ३३ हजार ३९५ नागरिकांना अद्याप कोरोनाचा पहिला डोससुद्धा मिळू शकला नाहीये. तर ३९ लाख ३१ हजार ६५२ नागरिकांना दुसरा डोस मिळणे बाकी आहे. आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यत लसीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी ७९ लाख ९८ हजार ४४२ डोस लागणार आहे. जिल्ह्यात जवळपास ८५ लाख ३९ हजार नागरिक लसीकरणास पात्र आहेत. आतापर्यंत ६५ लाख ०६ हजार ३११ जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी २५ लाख ७४ हजार ६५९ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण ९० लाख ८० हजार ९७० डोस दिले आहेत.

पुण्यात 20 लाख नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित
धरणांतून नदीपात्रात विसर्ग, गोदावरीला पूर तर कोल्हापूरलाही पुराचा धोका

पुण्यातील कोरोना आकडेवारी

उपचार सुरु : १,९०५

◆ नवे रुग्ण : १०७ (४,९८,२९०)

◆ डिस्चार्ज : २३९ (४,८७,४०४)

◆ चाचण्या : ५,६०३ (३२,३८,६९४)

◆ मृत्यू : ४ (८,९८१)

महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी

नवीन रुग्ण - २,७४०

डिस्चार्ज - ३,२३३

मृत्यू - २७

सक्रिय रुग्ण - ४९,८८०

आजपर्यंतचे एकूण रुग्ण - ६५,००,६१७

आजपर्यंत एकूण बरे झालेले - ६३,०९,०२१

आजपर्यंत एकूण मृत्यू - १,३८,१६९

आजपर्यंत एकून चाचण्या - ५,६०,८८,११४

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com