Pune : कॉलेज सुरू करण्यावरुन गोंधळ; अजित पवारांच्या निर्णयाला तिलांजली! पहा Video

अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पुण्यातील बहुतांश महाविद्यालये बंदच असल्याचं चित्र आहे.
Pune : कॉलेज सुरू करण्यावरुन गोंधळ; अजित पवारांच्या निर्णयाला तिलांजली! पहा Video
SPPU Ajit PawarSaamTv

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पुण्यातील बहुतांश महाविद्यालये बंदच असल्याचं चित्र आहे. कारण उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालये सुरु करण्यास अजून परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पुण्यात महाविद्यालये सुरु करण्यावरुन गोंधळात गोंधळ निर्माण झाला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतरही महाविद्यालये बंदच असल्याची स्थिती आहे. पुण्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाकडून अद्याप आदेश काढण्यात आलेला नाही.

पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेले फर्ग्युसन महाविद्यालय मंगळवारी सुरु झाले. जवळपास दीडेक वर्षांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाविद्यालयात पावले टाकलीही. पण, काहीच वेळात महाविद्यालये सुरु करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदेशच निघाले नसल्याचे स्पष्ट झाले. विद्यापीठानेही महाविद्यालय सुरु करण्याचे आदेश काढलेले नाहीत, कारण विद्यापीठाला उच्च शिक्षण विभागाकडून यासंदर्भात कोणतीही सूचनाच मिळालेली नाही.

SPPU Ajit Pawar
Mumbai : मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते : देवेंद्र फडणवीस

पुण्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा आदेश गेल्याच शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला होता. अजित पवारांच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने यासंदर्भात आदेश देखील काढले. विद्यार्थी व महाविद्यालयांची संख्या विचारात घेता सुरक्षिततेला प्राधान्य देत टप्प्या टप्प्याने प्रक्रिया राबविणे संदर्भात राज्य शासन व उच्च शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. यावर उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. दिवाळीनंतरच महाविद्यालये सुरु करु असं सांगणाऱ्या सामंतांची भाषाच बदलली. महाविकास आघाडीच्या या सावळ्या गोंधळात अजितदादांची घोषणा पुण्यातच हवेत विरली. शिवाय महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी देण्याचा अधिकार खरंच अजितदादांना होता का? हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.