
Latest Pune Corona News Update: पुणे : पुण्यात कोरोनाचा पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 1,104 पॅाझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे (Pune Corona Update 1104 People Tested Positive In Last 24 Hours).
तर दिवसभरात 151 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पुणे (Pune) शहरात कोरोनाबाधित एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्याबाहेर कुणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आज दिवसभरात पुण्यात एकूण एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
सध्या पुण्यात 89 क्रिटीकल रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात एकूण कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रूग्णांची संख्या 5,12,689 झाली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या सध्या 3790 इतकी आहे. तर एकूण 9119 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर आजपर्यंत एकूण 5,00,144 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकूण 6819 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी केली आहे.
Edited By - Nupur Uppal
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.