संतापजनक! पोटच्या लेकराला २ वर्ष कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलं

Pune Crime News : पुण्यातील दोन बेरोजगार आई-वडीलांनी स्वत:च्या मुलाला एका खोलीत कोंडलं.
संतापजनक! पोटच्या लेकराला २ वर्ष कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलं
pune couple kept the child in the room with the dogs for 2 yearsSaam Tv

पुणे : टारझनची गोष्ट सर्वांनाच माहिती असेल. वन्य प्राण्यांच्या सहवासात लहानाचा मोठा झालेल्या टारझनची वर्तणूक वन्य प्राण्यांसारखीच होते. माणूस असूनही त्याच्या अंगी त्या प्राण्यांचेच गुण उतरतात. पुण्यातल्या एका लहान मुलाच्या बाबतीत अशीच घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कुत्र्याच्या पिलांच्या सहवासात बंदिस्त राहिल्यामुळे हा मुलगा आपण माणूस आहोत हेच विसरून गेला आहे. पुण्यातल्या (Pune) कोंढवा परिसरातल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पीडित मुलाच्या (Child) पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण न्याय कायद्यातल्या विविध कलमांतर्गत गुन्हा (Crime) दाखल केला आहे. (Pune Latest Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील दोन बेरोजगार आई-वडीलांनी स्वत:च्या मुलाला एका खोलीत कोंडलं. पीडित मुलगा आणि त्याचे पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंग मधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्याच घरामध्ये कुत्र्याची २२ पिल्लंदेखील होती. त्या खोलीतील सर्व कुत्री भटकी होती. त्यांची नसबंदी झालेली नव्हती. शिवाय ती केव्हाही हिंस्र रूप धारण करू शकत होती. घरामध्ये सर्वत्र प्राण्यांनी घाण केलेली होती. अशा अस्वच्छ ठिकाणी तब्बल २२ कुत्र्यांच्या सान्निध्यात हा ११ वर्षांचा लहान मुलगा अडकलेला होता. प्राण्यांना आणि लहान मुलांना अशा अस्वच्छ स्थितीत ठेवणं हा गुन्हा आहे. कित्येक दिवसांपासून हा पीडित लहान मुलगा कुत्र्यांच्या सहवासात राहत होता. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे सदर मुलाला बाल सुधारगृहात पाठविण्यात आलं आहे.

pune couple kept the child in the room with the dogs for 2 years
बायकोला आणायला मालकाची गाडी घेऊन गेला आणि परत आलाच नाही!

दरम्यान, मुलाच्या पालकांनी कुत्र्यांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का, याचा तपास पोलीस करत आहे. तसेच बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर या जोडप्याला लवकरच अटक केली जाणार आहे. कित्येक दिवसांपासून पीडित मुलगा कुत्र्यांमध्ये राहत असल्याने सदर मुलाला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस स्टेशनमधले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली आहे. सदर संतापजनक कृत्याला बेरोजगार आई-वडीलांनाच जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी पीडित मुलाच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण न्याय कायद्यातल्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.