डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपींवर आज आरोप निश्चिती

पुणे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपींवर आज आरोप निश्चिती
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपींवर आज आरोप निश्चितीSaam Tv

पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे Sachin Andure , शरद कळसकर Sharad Kalaskar, अॅड. संजीव पुनाळेकर Sanjiv Punekar आणि विक्रम भावे Vikram Bhave यांच्यावर आरोप निश्‍चिती करण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आला आहेत. तर अॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून ॲड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत. आज पुणे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com