Pune Crime News: स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात आला अन् भलताच प्रताप केला; उच्चशिक्षित तरुणास अटक

आरोपी ऋषिकेश पाटील उच्चशिक्षित तरुण असून एका कंपनीत नोकरीस असल्याचेही समोर आले आहे
Wanavadi Police Station
Wanavadi Police StationSaamtv

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेला एका तरुणाने मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी तरुणास वानवडी पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश पाटील (वय २४, रा.कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Wanavadi Police Station
SSC-HSC Result 2023: विद्यार्थ्यांनो तयार राहा! दहावी-बारावीचा निकाल लवकरच, बोर्डाने दिली महत्वाची माहिती...

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या (Pune) रामटेकडी येथील डिजिटल हब येथे स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी फिर्यादी तरुण परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षेच्या वेळी उमेदवारांचे मोबाइल, कागदपत्रे आणि वस्तू ठेवण्यात आलेल्या बॅगा बाहेर ठेवण्यात आल्या होत्या. फिर्यादी तरुणानेही त्याची बॅग बाहेर ठेवली होती. मात्र परीक्षा संपल्यानंतर तरुणाला पिशवी सापडली नाही.

आणखी एका उमेदवाराची बॅग सापडली मात्र त्यामधील मोबाईल गायब होता. परीक्षा सुरू असताना मोबाइल चोरीचे प्रकार घडल्याने उमेदवारांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांना तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून ऋषिकेश पाटील याला ताब्यात घेतले. त्यावेळी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (Latest Marathi News)

Wanavadi Police Station
Chhatrapati Sambhajinagar News: धक्कादायक! कर्जाला कंटाळून पती पत्नीने मृत्यूला कवटाळले; पैठण तालुक्यात खळबळ

दरम्यान, पोलिसांनी आरोपी ऋषिकेश पाटील याच्याकडून मोबाइल संच, गणकयंत्र आणि एख दुचाकी असा ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी ऋषिकेश पाटील उच्चशिक्षित तरुण असून एका कंपनीत नोकरीस असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. या घटनेचा अधिक तपास वानवडी पोलिस (Police) करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com