Pune Crime: प्रियकरासाठी लाखोंचं कर्ज काढलं.. हप्ते भरण्यास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्यात खळबळ

Pune Hadapsar Crime: या प्रकरणी प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकर आदर्श अजयकुमार मेनन याला अटक करण्यात आली आहे.
Pune Crime News
Pune Crime Newssaam tv

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Crime News:

प्रियकराने कर्ज न फेडल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. शहरातील हडपसर भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राणी ऊर्फ रसिका रवींद्र दिवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून आदर्श अजयकुमार मेनन याला अटक करण्यात आली आहे.

Pune Crime News
Mumbai-Goa Higway Accident : कोकणात जाणाऱ्या एसटी बसला अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू १९ जण जखमी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदर्श अजयकुमार मेनन आणि राणी ऊर्फ रसिका रवींद्र दिवटे यांचे प्रेमसंबंध होते. रसिकाने आदर्शच्या सांगण्यावरून अनेकवेळा क्रेडिट कार्ड, लोन ॲपवरुन कर्ज काढून त्याला ३.७५ लाख रुपये दिले होते. (Crime Story)

कर्जाचे हप्ते आपण फेडू, असे आश्वासन आदर्शने तिला दिले होते. मात्र, त्याने कर्ज फेडले नाही. गुरुवार रात्री रसिका आणि आदर्श मध्ये या कर्जवरून भांडणे झाली आणि आदर्श ने पैसे नाही भरणार असे सांगितले. याचा राग मनात धरून आणि हताश झालेल्या रसिका ने पहाटे आदर्शच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकर आदर्श अजयकुमार मेनन याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Pune Crime News
Elephant Kills Man: गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुडगूस; हत्तीने सोंडेत धरून आपटल्याने वन कर्मचाऱ्याचा मृत्यू

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com