Pune Crime: महिलांचे मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
Pune Crime: महिलांचे मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
Pune Crime: महिलांचे मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी गजाआडसागर आव्हाड

सागर आव्हाड

पुणे: पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महिलांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसाकावून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यातील Vimantal Police Station तपास पथक व सर्व्हेलन्स पथकाकडून पेट्रोलिंग Patrolling करण्यात येत आहे. पोलिसांनी पेट्रोलिंगच्या पथकाने महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय चार जणांच्या टोळीला Inter state gang snatches अटक केली आहे.

हे देखील पहा-

त्यांच्याकडून तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेरली चांदसाहेब शेख (वय-२२), मनोज काशिनाथ कासले (वय-२०), बालाजी धनराज कासले (वय-२२), शिलारसाहेब मोहम्मद ईस्माईल सौदागर (वय-२०), सर्व रा. भालकी राज्य कर्नाटक सध्या रा. कस्तुरबा वसाहत औंध, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

Pune Crime: महिलांचे मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
Pune Crime: महिलांचे मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी गजाआडसागर आव्हाड

विमानतळ पोलिसांनी या अट्टल मोबाईल चोर आरोपींना विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात अटक केली. विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील Investigation Team अधिकारी आणि कर्मचारी त्या हद्दीत गस्त घालत होते आणि त्यावेळेस पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांना विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात चार जण दुचाकीवरून मोबाईल स्नॅचिंग करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

Pune Crime: महिलांचे मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
नऊ महिन्यांच्या गर्भवतीसारखे झाले होते तरुणाचे पोट; डॉक्टरकडे गेल्यावर कळले...

या माहितीच्या आधारे पथकातील पोलिसांनी सापळा रचला आणि दोन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेल्या चौघांना ताब्यात लगेच घेतले. तर त्यांच्याकडून १४ मोबाईल जप्त केले आहेत. तसेच त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी कर्नाटकातून Karnatak चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com