Pune Crime: किरकोळ वादातुन प्रियकराने केला प्रेयसीचा खून
Pune Crime: किरकोळ वादातुन प्रियकराने केला प्रेयसीचा खूनSaam Tv

Pune Crime: किरकोळ वादातुन प्रियकराने केला प्रेयसीचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना कात्रज जवळील रिलायन्स मार्टमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होती. तर आरोपी रामकिसन हा होटेलमध्ये कामाला होता.

पुणे: किरकोळ वादातुन प्रियकराने नवीन कात्रज बोगदा येथे तरुणीवर चाकूने वार केले. तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषीत कऱण्यात आले. ही घटना रविवारी रात्री 10 वाजता घडली आहे. प्रेयसिच्या खुनाप्रकरणी प्रियकरास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सपना दिलीप पाटील (वय 32, रा. पवार हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव असून रामकिसन गिरी (वय 36, रा. परभणी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

Pune Crime: किरकोळ वादातुन प्रियकराने केला प्रेयसीचा खून
Maharashtra Politics: हसन मुश्रीफांनी केला १२७ कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना कात्रज जवळील रिलायन्स मार्टमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होती. तर आरोपी रामकिसन हा होटेलमध्ये कामाला होता. मागील 5 ते 6 वर्षापासून त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. दरम्यान, रविवारी रामकिसनने कार भाडयाने करुन सपनाला जेवण करण्यासाठी बाहेर घेवून गेला. त्यानंतर त्याने कार चालकास नवले पूलापासून कात्रज नवीन बोगद्याकडे गाडी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर रामकिसनने त्याच्याकडील चाक़ूने सपनावर वार केले, त्यानंतर रामकिसनने घटनास्थळावरुन पळ काढला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सपनाला कार चालकाने जवळच्या रुग्णालयात नेले. तेथून तिला उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाताच भारती विद्यापीठ पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी रामकिसन यास अटक केली.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com