पुणे हादरलं! तरुणीने बोलण सोडलं म्हणून तरुणाला राग अनावर; त्यानंतर...

प्रीतीकुमारी साह असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
Pune Crime
Pune CrimeSaam TV

पुणे : मुलीची आई आणि मुलगी बोलत नसल्याच्या रागातून तरुणाने अल्पवयीन तरुणीचा राहत्या घरात गळा दाबुन खून केल्याची केल्याची घटना घडली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रीतीकुमारी साह असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर विष्णुकुमार असे आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

Pune Crime
India Corona Update: देशात 24 तासात 17,073 नवे कोरोना रुग्ण, 25 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृत तरुणी बिहार राज्यातील एकाच गावातील रहिवाशी आहे. दोघांचेही कुटुंब चाकण येथील नाणेकरवाडी नोकरीसाठी वास्तव्यास आहे. त्यातच पीडित मुलीची आई आणि विष्णुकुमार एकाच कंपनीत काम करत होते. मात्र, दरम्यानच्या काळात दोन्ही कुटुंबात वाद झाला. त्यामुळे मृत मुलीच्या आईने आरोपी तरुणासह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींशी बोलणे सोडलं. (Pune Latest Marathi News)

Pune Crime
सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळून ट्रेकरचा मृत्यू

दरम्यान, आई बोलत नसल्याने मृत मुलीनेही आरोपीसोबत बोलणे सोडले. याचा राग मनात धरून आरोपी विष्णुकुमार याने प्रीतीकुमारी घरात एकटी असल्याचे बघून तिची गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विष्णुकुमार याला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com