पुण्यातील कबड्डीपटूच्या खुनाचा 12 तासात उलगडा; सर्व आरोपी अटकेत

पुण्यातील बिबवेवाडी इथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या कबड्डीपटूच्या खुनाचा पुणे पोलिसांनी अवघ्या १२ तासात उलगडा करुन चारही आरोपींना अटक केली आहे.
पुण्यातील कबड्डीपटूच्या खुनाचा 12 तासात उलगडा; सर्व आरोपी अटकेत
पुण्यातील कबड्डीपटूच्या खुनाचा 12 तासात उलगडा; सर्व आरोपी अटकेतSaam Tv

पुणे: पुण्यातील बिबवेवाडी इथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या कबड्डीपटूच्या खुनाचा पुणे पोलिसांनी अवघ्या १२ तासात उलगडा करुन चारही आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी असलेल्या ऋषिकेश भागवत याला आज पहाटे पुणे अटक केली आहे. पुण्याच्या बिबवेवाडी भागातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या निर्घृण खुनाचा पूर्णपणे उलगडा पुणे पोलिसांनी अवघ्या १२ तासात केला आहे. घटनास्थळाशेजारील झुडपात रात्रभर लपून बसलेल्या मुख्य आरोपी ऋषिकेश भागवत बुधवारी पहाटे अटक केली आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

आरोपी ऋषिकेश भागवत हा खून झालेल्या कबड्डीपटूचा नातेवाईक आहे. गेल्यावर्षीपर्यंत तो कबड्डीपटूच्या घराजवळच राहत होता. मात्र एकतर्फी प्रेमातून त्याने अल्पवयीन कबड्डीपटुला निर्घृणपणे संपवलं. घटना घडण्याच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी गस्तीवर असलेल्या मार्शल पोलिसांचा घटनास्थळाचा राउंडही झाला होता. पुण्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराची गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. घटना घडल्यानंतर पोलीस लागलीच आरोपींना अटक करत असले तरी घटना घडूच नये, यासाठी पुणे पोलिसांचा वचक असायला हवा, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.