Pune News : स्विमिंगपूलमध्ये पडून दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; लोणावळ्यातील दुर्देवी घटना

मॅजिक बॉल गिळल्याने नाशकातील दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लोणावळ्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Pune Lonavala News
Pune Lonavala NewsSaam TV

दिलीप कांबळे, साम टीव्ही

मावळ : मॅजिक बॉल गिळल्याने नाशकातील दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लोणावळ्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये पडून एका दोन वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रिछलीहिल भागातील एका बंगल्याच्या स्विमिंगपूलमध्ये ही घटना घडली. हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद (वय 2 वर्ष) असे मयत झालेल्या बालिकेचे नाव आहे. (Latest Marathi News)

Pune Lonavala News
Chandrapur Bridge Collapse: बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला; शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

लोणावळा शहर पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार कार्निवल विला बंगलो, प्रिचली हिल बार्क हॉटेलचे पाठीमागे लोणावळा येथे ही दुर्घटना घडली. मोहम्मदनदिम सैयद हे इतर सदस्यांसोबत बंगल्यात नाष्टा करत असताना बाहेर असलेल्या स्विमिंग पूल मध्ये ही दुर्घटना घडली.

बाहेरून अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने ते सर्वजण बाहेर गेले असता त्यांना हानियाझैरा ही पाण्यात पडलेली दिसली. त्यांनी तिला तातडीने पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच हानियाझैराचा मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Pune Lonavala News
VIDEO : नवी मुंबईत हॉटेलमध्ये जोरदार राडा; दोघांना 12 जणांकडून जबर मारहाण, संपूर्ण थरार CCTVमध्ये कैद

नाशकात मॅजिक बॉल गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू

 नाशिकमध्ये (Nashik) मॅजिक बॉल गिळल्याने एका १८ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शिवांश संकेत बोराडे असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिवांश याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. इतकंच नाही, तर या महिलेने तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिच्या पतीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. कौटुंबीक मतभेदामुळे १८ महिन्यांचे बाळ घरात असल्याचे माहित असताना देखील पतीने त्याला खेळण्यासाठी मॅजिक बॉल आणला, असा आरोप शिवांश याच्या आईने केला आहे. 

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com