Pune News: पुण्यात भयंकर घटना! बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा केला प्रयत्न

बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेला पुण्यात आरोपीने पेट्रोल टाकून जाळण्याचा केला प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Crime News
Crime NewsSaamTv

Pune Crime News: पुण्यामधील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असतानाच पुन्हा एकदा पुण्याला हादरवणारी घटना घडली आहे. बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेला पुण्यात आरोपीने पेट्रोल टाकून जाळण्याचा केला प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बातमीने खळबळ माजली आहे. (Pune News)

Crime News
Education News: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! इतिहासातील सर्वात मोठी मेगाभरती, 8 हजार 169 पदे भरली जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा भिमनगर मधील म्हाडा कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रमजान खलील पटेल असे आरोपीचे नाव असून आरोपी रमजान याच्यावर पीडित महिलेने २०२८ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलीस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने महिलेकडे तगादा लावला होता. घटनेतील आरोपीने काल दुपारच्या सुमारास महिलेला तू दाखल केलेली बलात्काराची तक्रार पाठीमागे घे म्हणत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा केला प्रयत्न केला.

Crime News
Dhule Corporation News: दलित वस्ती योजनेत भ्रष्टाचार; संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा

याप्रकरणी आरोपीवर पुण्यातील मुंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेतील आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशीही करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पुण्यातील वाढती गुन्हेगारीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com