इंजिनीअरला लागले क्रिकेट सट्ट्याचे वेड; त्यानं असं काही केलं की पोलीसही चक्रावले

बेटींगमुळे (Betting) तो कर्जबाजारी झाला. कर्जबाजारी झालेल्या तरुणाने चोरी करायला सुरुवात केली. मात्र, पोलिसांना त्याची चोरी (Robbery) नजरेस येताच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
इंजिनीअरला लागले क्रिकेट सट्ट्याचे वेड;  त्यानं असं काही केलं की पोलीसही चक्रावले
Cricket ground Saam Tv

पुणे : अनेकजण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करून स्वप्न करतात. मात्र, काही यशस्वी होण्यासाठी आड मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. नेमक्या त्याचवेळी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. असाच काहीसा प्रकार उच्चशिक्षित बी. टेक इंजिनीअरसोबत झाला आहे. या तरुणाने क्रिकेटप्रेमापोटी (Cricket) नामांकित कंपनीतील नोकरी सोडली. नोकरी सोडल्यावर या तरुणाने आयपीएल'सारख्या क्रिकेट सामन्यांसाठी बेटींग लावायला सुरुवात केली. मात्र,त्याच्या नशीबाची चक्रे उलटे फिरले. या बेटींगमुळे (Betting) तो कर्जबाजारी झाला. कर्जबाजारी झालेल्या तरुणाने चोरी करायला सुरुवात केली. मात्र, पोलिसांना त्याची चोरी (Robbery) नजरेस येताच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ( Pune Crime News In Marathi )

Cricket ground
'त्या' वाहन चालकांवर कडक कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश

मिळालेल्या माहिनीनुसार, उच्चशिक्षित बी. टेक इंजिनीअर क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावून कर्जबाजारी झाल्याने चोरी करू लागला. विमानाने क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणी पोहचून तेथील खेळाडूंचे टॅब, वस्तू , डेबीट कार्ड, पैसे चोरी करायला लागला. मात्र, त्याची चोरी पोलिसांनी पकडली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी मात्र थेट हरियाणात जाऊन बेड्या ठोकल्या. ट्विंकल अर्जुन अरोरा (३०) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील एका नागरिक राजयोग लॉन्स येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या कारमध्ये मोबाईल, टॅब, डेबीट कार्ड अशा वस्तू ठेवल्या होत्या. मात्र, ते क्रिकेट खेळण्यासाठी जाताना कारचा दरवाजा लावण्यास विसरले. मात्र, या संधीचा गैरफायदा चोरट्याने घेतला. त्याने त्यावेळी कारमधून दोन डेबीट कार्ड, एक टॅब चोरट्याने चोरून नेले. डेबीट कार्ड हाती लागताच त्याने खात्यातून एक लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर तीन लाख काढून घेतले. असे एकूण चोरट्याने सव्वा लाखाचा ऐवज चोरला. मात्र, पैसे चोरीला गेल्याचे कळताच बिबवेवाडीतील नागरिकाने पोलिसात धाव घेतली. चोरट्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

Cricket ground
मोठी बातमी ! आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवक-युवतींना ITI मधून मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

पोलिसात तक्रार दाखल होताच त्यांनी चोरट्याला शोधण्यासाठी चक्रे फिरवली. त्यानंतर पोलीस तपासात चोरट्याने डेबीट कार्डचा वापर करून दोन महागडे मोबाईल खरेदी केल्याचे तांत्रिक तपासातून समजले. आरोपी डेबीड कार्डचा वापर करून अधून-मधून पैसेही काढत होता. त्यानंतर पोलिसांना विमाने गेल्याचे कळाले. त्यानंतर लोहगाव विमानतळावर जाऊन सीसीटीव्ही चित्रीकरण आणि विमानाच्या तिकीटाचे बुकींग तपासले. पुढे तांत्रिक विश्लेषणात आरोपीचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला. त्यामुळे तो हरियाणाचा रहिवासी असून ट्विंकल अर्जुन अरोरा नाव असल्याचे कळाले. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांचे एक पथक हरियाणा येथे गेले. तेथे मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com