Pune Crime News : प्रेमविवाहानंतर तिने सुखी संसाराची स्वप्ने पाहिली, पण घडलं भलतंच; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune News : विवाहानंतर अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या तरुणीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
Pune Crime News
Pune Crime Newssaam tv news

Pune Crime News : तरुण आणि तरुणी एकाच कंपनीत नोकरी करत होते. तेथे त्यांची ओळख झाली. कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. मुलीच्या हट्टामुळे तिच्या आई-वडिलांनी लाखो रुपये खर्च करून विवाह करून दिला.प्रेमविवाहानंतर तिने सुखी संसाराची स्वप्ने पाहिली. पण असं काही घडलं, की तिने कधी विचार सुद्धा केला नव्हता.  (Latest Marathi News)

Pune Crime News
Pune Koyata Gang: मैत्रिणीला भेटायला आला अन् फसला, कोयता गँगचा म्होरक्या पुणे पोलिसांच्या ताब्यात

विवाहानंतर अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या तरुणीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव (Crime News) टाकण्यात आला. अमेरिकन पोलिसांनी तिची सुटका केली. पुण्यात आल्यानंतर तिने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तरुणीच्या पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार अमेरिका आणि नवी मुंबईतील खारघरमध्ये १ डिसेंबर २०२२ पासून सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचा दोन्ही परिवाराच्या संमतीने आंतरजातीय विवाह झाला. साखरपुड्यात फिर्यादीच्या वडिलांनी १० लाखांचा खर्च केला. लग्नात हुंडा म्हणून ५० हजार डॉलर दिले. याशिवाय, सासू आणि पतीच्या दोन्ही बहिणींना प्रत्येकी पाच तोळ्यांचा सोन्याचा हार दिला.

Pune Crime News
Nashik Crime News : घरात एकटीच होती महिला; अचानक दीर आला अन्.., धक्कादायक घटनेनं नाशिक हादरलं!

लग्नानंतर नणंदेचा पती विवाहित तरुणीला धर्मांतरासाठी दबाव टाकत होता. परंतु तिने त्याला स्पष्ट नकार दिला. नणंद आणि पतीच्या छळामुळे ती माहेरी पुण्यात आली. त्यानंतर तिचा पती अमेरिकेस निघून गेला. दरम्यान, साखरपुड्यात पतीच्या जुळ्या भावाच्या वागणुकीवरून विवाहितेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात (Pune Crime)  तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घ्यावी, यासाठी पतीने तिला आपण चांगला संसार करू, असे सांगून अमेरिकेत बोलावून घेतले.

त्यावर विश्वास ठेवून विवाहित तरुणी १४ फेब्रुवारीला अमेरिकेला गेली. परंतु माझ्या भावाविरोधात दिलेली तक्रार मागे घेतली तरच मी तुला नांदवतो, असे म्हणून तिचा छळ सुरू केला. त्याला कंटाळून विवाहित तरुणीने अमेरिकन पोलिसांना कॉल करुन मदत मागितली. पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. अखेर वडिलांनी अमेरिकेला जाऊन मुलीला पुण्यात आणल्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com