लोणावळा परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एक जण ताब्यात

या रॅकेटमधून दोन मुलीची सुटका
लोणावळा परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एक जण ताब्यात
लोणावळा परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एक जण ताब्यातदिलीप कांबळे

मावळ - लोणावळा परिसरात सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा सापळा रचत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन मुलींची सुटका या रॅकेटमधून करण्यात आली आहे. यासह एका दलालास पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव न्यायालयात या आरोपीला हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत ही मोठी कारवाई केली आहे.

हे देखील पहा -

धनंजय कातवारू राजभर असे अटक केलेल्या आरोपाचे नाव आहे. आरोपी धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे रॅकेट चालवत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. तसेच यामध्ये आजुन कोणकोण सहभागी आहेत याचा शोध सुरु आहे. लवकरच सर्वजण गजाआड असतील असा विश्वास देखील यावेळी पोलीस निरीक्षक मोरे यांनी व्यक्त केला आहे.

लोणावळा परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एक जण ताब्यात
पिंपरी-चिंचवडमध्ये महिला डॉक्टरसोबत 'सेक्सटॉर्शन'

आरोपी हा व्हॉट्सअपच्या Whatsapp माध्यमातून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवत दर ठरवत असे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे आरोपीशी संपर्क साधला. त्याने व्हॉट्सअप वर मुलींचे फोटो पाठवून दर ठरवल्यानंतर या मुलींना तो लोणावळा येथे घेऊन येतो असे सांगितल्यानंतर पोलिसांनी सदर जागी सापळा रचला. त्यानंतर आरोपी हा मोटारीतून दोन मुली घेऊन त्या ठिकाणी आला. खात्री पटताच पथकाने या आरोपीला ताब्यात घेतले असून दोन्ही मुली दिल्ली येथून वेश्या व्यवसायासाठी आणल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com