धक्कादायक! मामानेच केली २५ वर्षीय भाच्याची हत्या; पुण्यातील खळबळजनक घटना

पुण्याचा खेड तालुक्यातील सेझ प्रकल्प क्षेत्रात पैशांसाठी मामाने भाच्याची हत्या केली आहे. हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! मामानेच केली २५ वर्षीय भाच्याची हत्या; पुण्यातील खळबळजनक घटना
Pune Crime News Saam Tv

पुणे : पैशापुढे नात्याला काहीच किंमत नसते, एवढंच नाही तर पैशांसाठी नात्याच्या रक्ताचाही घोट घेतला जातो. असाच काहीसा प्रकार पुण्याचा (Pune) खेड तालुक्यातील सेझ प्रकल्प क्षेत्रात घडला आहे. जमिनीच्या वाटणीवरून पैशांची मागणी करून त्रास देणाऱ्या बहिणीच्या २५ वर्षीय मुलाची मामानेच डोक्यात दगड टाकून निर्घृण हत्या (Killing) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय भालेराव असे मृत तरुणाचे नाव आहे. ( Pune crime News In Marathi)

Pune Crime News
उल्हासनगरात दुकान फोडून किराणा मालासह रोख रक्कम चोरी; त्रिकुटाला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील सेझमध्ये संपादित झालेल्या रेटवडी येथील जमिनीच्या मोबादल्यावरून खेडमधील कुटुंबाचा वाद सुरू होता. मोबादल्याचा वाटा आईला मिळावा यासाठी अजय भालेराव आणि त्यांचा मामा शांताराम शिंदे, मामेभाऊ सुनील शिंदे यांच्यात वाद सुरू होता. जमिनीवरील पैशाचा वाद विकोपाला गेला. या वादात खेड सेझ परिसरातील कमानीजवळ मामेभाऊ व मामाने भाचा अजय भालेराव यांच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली. या हत्येची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. राजगुरूनगर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल होऊन हत्या करणाऱ्या मामा आणि त्यांचा मुलाचा शोध घेत आहे.

Pune Crime News
मालमत्तेवरुन वडील मुलांमध्ये वाद; पोलिसांसमोरच मुलाने जाळून घेतले

हत्येचे नेमकं कारण काय ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम शिंदे यांची रेटवडी वडिलोपार्जित जमीन खेड सेझ प्रकल्पात संपादित झाली.त्या संपादित जमिनीचा रोख स्वरुपातील मोबादला मिळण्यासाठी भाचा अजय भालेराव वारंवार मागणी करत होता. यावरून मामा शांताराम शिंदे आणि भाचा अजय भालेराव यांच्यात अनेक वेळा वाद झाले. मात्र मामा -भाच्याचा वाद टोकाला गेला, त्याचा शेवट भाचा अजय भालेराव यांच्या हत्येना झाला. पैशांसाठी आपलीच नाती आपल्याच रक्ताचा घोट घेतात हेच घटनेतून पुढे आले आहे. या घटनेची माहिती राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अजून फरार आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com