Pune Crime News : डोक्यावरून पोते घेऊन जाणाऱ्या सासू - सुनेला अटक; दोघींकडून ४ लाख रुपयांचा गांजा जप्त

या दोघीही काहीतरी बेकायदेशीर काम करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात दोन सामान्य महिलांकडून पोलिसांनी ४ लाख किमतीचा गांजा जप्त केला आहे. लोणीकाळभोर परिसरातून पोलिसांनी या दोघींना अटक केली आहे. दोन्ही महिला पोत्यात गांजा भरून घेऊन चालल्या होत्या. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी येथील सार्वजनिक रोडवर (Road) पेट्रोलिंग करीत असताना तेथील पोलिसांना या महिला दिसल्या. दोघींच्या डोक्यावर सामान भरलेले नायलॉनचे एक पोते होते. त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी दोघींना थांबायला सांगितले.

Pune Crime News
Pune Crime News:चारित्र्यावर संशय घेत चाकू भोसकून पत्नीची हत्या

पोलिसांनी(Police) त्यांना पोत्यात काय आहे असे विचारले. तेव्हा दोघींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या दोघीही काहीतरी बेकायदेशीर काम करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या पोत्यात १० किलो २४५ ग्रॅम गांजा सापडला. याची किंमत २ लाख रुपये इकती आहे. या दोघी सासू सुन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pune Crime News
Pune Crime : पाळीव श्वानाला दगड का मारला? म्हणत चिडलेल्या मालकालाने केलं भयंकर कृत्य

दोघींकडे एकूण २० किलो ६१० ग्रॅम गांजा विक्रीसाठी, अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या विक्री करिता बाळगल्या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना नेमक्या कोणत्या व्यक्तीला हा गांजा विकायचा होता याचा पोलीस तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com