Pune Isis Module Case: पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात NIAचा मोठा निर्णय; चार वॉंटेड आरोपींवर ठेवले लाखोंचे बक्षिस

Nia Cash Reward on Pune Isis Module: इसीस मोड्युल प्रकरणातील चार वाँटेड आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस जाहीर आले आहे.
Pune ISIS Module Case
Pune ISIS Module CaseSaan Tv

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Isis Module Case Update: काही महिन्यांपूर्वी पुणे शहरात दोन दहशतवादी सापडल्याने खळबळ उडाली होती. १८ जुलै रोजी सापडलेल्या या दोन दहशतवाद्यांचा थेट इसिसशी संबंध असल्याचेही पोलीस तपासात समोर आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून राष्ट्रीय तपास यंत्रणेने इतर चार आरोपींवर लाखो रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

Pune ISIS Module Case
Nana Patole News: ते काय पाकिस्तानात जावून हनुमान चालीसा पठन करणार; नाना पटोलेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे (Pune) इसीस मोड्युल प्रकरणातील चार वाँटेड आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस जाहीर आले आहे. मोहम्मद शहनवाज, शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि ताला लिवाकत खान अशी या चार आरोपींची नावे आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) या चारही जणांवर बक्षीस ठेवण्यात आलेली असून दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्या प्रकरणी या आरोपींचा वॉन्टेड यादीत समावेश करण्यात आला आहे. आरोपींना पकडून देणाऱ्यांना हे बक्षिस दिले जाणार असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. एनआयएकडून आत्तापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून हे आरोपी बॉंम्ब बनवण्याची कार्यशाळा घेत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. (Latest Marathi News)

Pune ISIS Module Case
Maratha Arakshan : CM शिंदेंचा खास संदेश घेऊन उदय सामंत विशेष विमानानं मनोज जरांगेंच्या भेटीला

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com