Pune : लोणी काळभोरमध्ये इंधनाचा काळाबाजार; पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या

टँकरमधील पेट्रोल व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या अवैध धंदा लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उध्वस्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
pune crime news
pune crime newssaam tv

सचिन जाधव

पुणे : पुण्यातील (Pune) लोणी काळभोर परिसरात पेट्रोल व डिझेल चोरी करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. टँकरमधील पेट्रोल व डिझेल चोरी (Theft) करणाऱ्या टोळीच्या अवैध धंदा लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उध्वस्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. (Pune crime News In Marathi )

pune crime news
Mumbai News: धक्कादायक! मुंबईत एकाच कुटुंबातील ४ जणांचे सापडले मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हवेली तालुक्यातील वळती गाव येथे वळती आळंदी मातोबाची रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. सदर ठिकाणी एका शेतात गैरकायदेशीररीत्या पेट्रोल व डिझेल भरलेला ट्रक टँकरमधील पेट्रोल व डिझेल काढून घेऊन त्या इंधनाची काळ्या बाजाराने विक्री करण्याकरिता काढत असल्याची माहीती होती. जिल्हा पुरवठा अधिकारी,बीपीसीएल कंपनीचे डेपो इन्चार्ज व इतर वरिष्ठ अधिकारींसोबत छापा टाकून पेट्रोल व डिझेलची चोरी आणि काळाबाजार करताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बालाजी मधुकर बजबळकर,दत्तात्रय गजेंद्र बजबळकर,उत्तम विजय गायकवाड,अजिंक्य मारुती शिरसाट,साहिल दिलीप तुपे या पाच जणांना ताब्यात घेतले तर पाच आरोपी फरारी आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

pune crime news
Breaking News : शाळेत जाणाऱ्या मुलीला ट्रकनं चिरडलं, संतप्त गावकऱ्यांनी ट्रकच पेटवला

दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून एकूण ८१ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात केला आहे. त्यामध्ये रोख रक्कम अडीच हजार रुपये तसेच २५ हजार किंमतीचे ६ मोबाईल सेट्स,८० लाख किमतीचा एक इंधनाने भरलेला भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर,३ डिझेलने भरलेले कॅन,६५ हजार रुपये किमतीच्या ३ दुचाकी मोटरसायकल व इतर साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com