
पुणे : सोशल मीडियाचे जेवढे फायदे असतात, तेवढे तोटे असतात. मोबाईल लोन अॅपच्या (Loan) दादागिरीमुळे आता नागरिकही अक्षरश: त्रस्त झाले आहेत. याच पद्धतीने गेल्या पाच महिन्यात पुणे शहरातील तब्बल चौदाशे जणांना 'मोबाईल लोन अॅप'द्वारे शिवीगाळ, बदनामी व जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची तक्रार सायबर (Cyber) पोलिसांकडे आली आहे. (Pune Latest Marathi News)
खासगी सावकार, फायनान्स कंपन्या, वाहन , गृह कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून कर्जफेडीसाठी नागरिकांना त्रास देऊन त्यांचे जगणे मुश्किल केले जात असल्याचा घटना शहरात सातत्याने घडत आहेत . त्यामध्ये 'मोबाईल लोन अॅप'ची भर पडली आहे. कोरोनामुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या, छोटे-मोठे व्यवसाय गेले. त्यामुळे अनेकांचे जगणे मुश्किल होत आहे. त्यामुळे काही जणांकडून थोडेफार कर्ज घेऊन छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्याचा कल असतो. (Loan App News in Marathi)
बँका, फायनान्स कंपन्या आणि नातेवाईकांकडे काही वेळा ५ ते १० हजार रुपये कर्ज मिळणे मुश्किल असते. त्यामुळे या नागरिकांना तत्काळ कर्ज मिळण्यासाठी 'मोबाईल लोन अॅप'कडे वळतात. मात्र, त्यानंतर हे नागरिक 'मोबाईल लोन अॅप'च्या जाळ्यात अडकतात. घेतलेल्या कर्जामुळे अॅप कंपन्यांच्या संबंधित व्यक्तींकडून कर्ज घेणाऱ्या नागरिकांना त्रास दिला जातो. यामुळे या अॅपवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, सदर अॅप वाले हे ५ ते १० हजार रुपयांचे कर्ज देतो, अशा आकर्षक जाहीराती फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅपवर झळकतात. त्या जाहीरातील नागरिक प्रतिसाद देऊन कर्ज घेतात. त्यानंतर कर्जफेड करण्याची मुदत संपल्यानंतर तत्काळ संबंधित कंपन्यांच्या व्यक्तीचे फोन येण्यास सुरुवात होते. त्यानंतर कर्ज घेणाऱ्यांच्या कुटुंबीयांपासून ते मित्र, नातेवाईकांनाही फोन, मेसेजद्वारे संपर्क साधून अश्लील भाषेत शिवीगाळ,धमकी दिली जाते .त्यामुळे नागरीक अक्षरशः त्रस्त होत आहे. मात्र, असे कॉल आल्यावर थेट पोलिसात तक्रार करा, असे आवाहन पोलिसांकडून (Police) करण्यात आले आहे.
मोबाईल लोन अॅप' बाबतच्या तक्रारी
वर्ष तक्रारी
२०२० - ६९९
२०२१ - ९२८
२०२२(आतापर्यंत) - १४३६
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.