Pune : धक्कादायक! प्रेयसीच्या हत्येनंतर फरार झालेल्या प्रियकराने संपवलं आयुष्य

हत्या करून पळालेल्या प्रियकर प्रतीक ढमालेने देखील जंगलात जाऊन गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.
pune crime news
pune crime newsSaam TV

Pune News : पुण्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुणे शहरात 9 नोव्हेंबर रोजी लग्नाला नकार दिल्याने उच्चशिक्षित श्वेता रानवडे या 22 वर्षांच्या तरुणीची प्रियकराने भरदिवसा तीक्ष्ण शस्त्राने वार करून हत्या केली. हत्या करून पळालेल्या प्रियकर प्रतीक ढमालेने देखील जंगलात जाऊन गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. (Latest Marathi News)

pune crime news
Dapoli Crime: बँकेच्या ATMमध्ये पैसे लोडिंग न करता 55 लाख 50 हजार रुपयांची अफरातफर; दोघेजण दापोली पोलिसांच्या ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील टाटा डॅमजवळ त्याचा मृतदेह सापडला. प्रतीक आणि श्वेता दोघेही नात्यातले होते. दोघांचेही 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचे लग्नही ठरले होते.

मात्र अलीकडे प्रतीकची वर्तणूक खटकत असल्याने श्वेताने त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकत लग्नास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या प्रतिकने श्वेताच्या पोटात चाकूने वार करून तिची हत्या केली. या संपूर्ण प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चतुशृंगी पोलिसांच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कारण, श्वेताने घटनेच्या काही दिवस आधीच चतु:शृंगी पोलिसांकडे प्रतीकची तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नाही. त्यामुळे हे हत्याकांड आणि आत्महत्या प्रकरण घडल्याचा आरोप होऊ लागला आहे. पोलिसांना (Police) लिहिलेल्या तक्रार अर्जात श्वेताने गंभीर आरोप केले होते.

बोलणे बंद केल्यामुळे प्रतिकने श्वेताला खोटे बोलून भेटायला बोलावले आणि गाडीत जबरदस्तीने बसायला भाग पाडून दूर घेऊन गेला. श्वेता त्याच्यासमोर रडत होती, हात जोडत होती मात्र तो ऐकायला तयार नव्हता.

त्यानंतर श्वेताला प्रत्येकवेळी धमक्या दिल्या जात होत्या, नाही ऐकलं तर घरात घुसून तमाशा करू अशा धमक्या दिल्या गेल्या. त्याचा स्वभाव पटत नसल्यामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा परिणाम भोगायला तयार रहा म्हणून त्याने धमकी देखील दिली होती. एकत्र असताना काढलेल्या फोटो, व्हिडीओचा तो गैरवापर करू शकतो. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार तिने दिलेली होती.

pune crime news
Pune Crime: सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री; सिंहगड पोलिसांकडून दोघांना अटक

22 सप्टेंबर रोजी श्वेताने पोलिसांना हा तक्रार अर्ज दिला होता. गंभीर स्वरूपाचे आरोप असलेला तक्रार अर्ज आल्यानंतरही चतु:शृंगी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. दीड महिना आधीच आपल्यावरचे संकट श्वेताने ओळखले होते. त्याची कल्पनाही तिने पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी श्वेताच्या तक्रार अर्जावर कोणतीही कारवाई न केल्याने प्रतीकचे मनोधैर्य वाढले व 9 नोव्हेंबर रोजी त्याने श्वेताचा निर्घृण हत्या केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com