Pune Crime News: राज्यभरातील किराणा दुकानदारांना लुटायचे; असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime news: पुणे पोलिसांनी अनेक व्यावयिकांना गंडा घालणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv

अक्षय बडवे

Pune Crime News: पुणे पोलिसांनी अनेक व्यावयिकांना गंडा घालणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. राज्यातील किराणा दुकानदारांना फसवणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला पुण्यात अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

सांगली, नागपूर, पिंपरी चिंचवड यासारख्या अनेक शहरात किराणा दुकानदारांकडून माल घेऊन पळून जाणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १ कोटी रुपयांपर्यंत राज्यातील अनेक व्यावसायिकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. या आरोपीने कोविड काळात संपूर्ण घोटाळा केल्याची माहितीही समोर आली आहे.

Pune Crime News
Hingoli Crime News: अल्पवयीन मुलीच्या फोटोशी छेडछाड; अश्लील फोटो समाज माध्यमावर अपलोड करताच पुढे जे काही झालं...

हितेश नानकराम आसवानी (३५) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून तो नागपूरचा आहे. या प्रकरणी त्याचा साथीदार भूषण वसंत तन्ना याच्या विरुद्ध देखील गुन्हा आरोपी आसवानी आणि तन्ना यांनी राधा एंटरप्रायजेस नावाने व्यवसाय सुरू केला होता.

त्या दोघांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून तूप, गूळ, बदाम, सुपारी, रवा असा माल मोठ्या प्रमाणावर खरेदी केला. त्यानंतर ते पैसे न देता पसार झाले होते. या दोघांच्या विरोधात राज्यातील विविध ६ पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

Pune Crime News
MP Crime News: 'बाबा मला वाचवा...' वडिलांना मुलीचा फोन, हॉटेलमध्ये जावून पाहताच सगळेच हादरले; दोघांचेही मृतदेह...

पुण्यात सायबर गुन्ह्यात वाढ

पुणे शहरात सायबर क्राईम गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक माहिती अशी की सायबर पोलिसात दररोज अशा किमान २ तक्रारी अर्ज दाखल होत आहेत. त्यामुळे पार्ट टाईम जॉब करा किंवा कंपनीचे टास्क पूर्ण करा आणि लाखो कमवा, अशा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पुणे पोलिस तसेच सायबर तज्ञांनी केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून (Pune) सायबर चोरट्यांनी सोशल मीडियावर आपले नेटवर्क चांगलेच पसरवले आहे. फेसबुक, व्हॉट्सऍप यानंतर आता टेलिग्रामकडेही त्यांनी मोर्चा वळवला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com