Pune : संतापजनक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन अत्याचार; माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य

पुणे जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
pune crime news
pune crime news saam tv

Pune Crime News : पुण्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुणे जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील एका माजी सरपंचाने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

pune crime news
Mumbai : अभिनेते अनू कपूर यांची लाखोंची ऑनलाईन फसवणूक करणारा गजाआड; आरोपीला बिहारमधून अटक

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात (Pune) १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील एका माजी सरपंचाचे हे कृत्य केलं आहे. संतोष नाझिरकर (४०) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नझिरकर पुरंदर तालुक्यातील नझिरे गावाचे माजी सरपंच आहे.

pune crime news
Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; पुण्यात ८७ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिरकरची पीडित मुलीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसातच त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली. बुधवारी बाहेर जेवायला जाऊ अस सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज येथे असलेल्या एका लॉजवर नेले. त्याठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीने बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com