Pune : मुलावर उपचार करण्यासाठी भोंदू बाबाकडे गेलेल्या महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

मांजरी येथे पुणे जिल्ह्याला हादरवणारी घटना घडली आहे. दिव्यांग मुलावर उपचार करण्याच्या बहाण्याने एका महाराजने महिलेवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
hadapasar police station
hadapasar police station Saam tv

गोपाल मोटघरे

पुणे : मांजरी येथे पुणे (Pune ) जिल्ह्याला हादरवणारी घटना घडली आहे. दिव्यांग मुलावर उपचार करण्याच्या बहाण्याने एका महाराजने महिलेवर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा (Crime ) दाखल केला आहे. (Pune Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरीतील ३६ वर्षीय महिलेला दिव्यांग मुलगा होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार करून त्याला बरे करायची इच्छा होती. त्यासाठी डॉक्टरांना संपर्क करण्याऐवजी जादू टोणा करणाऱ्या महाराजाला भेटली. त्यानंतर महाराजाने महिलेला दिव्यांग मुलाला बरे करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी महाराजांनी महिलेला नग्न पूजा करावी लागेल हे सांगितले. त्यानुसार महिलेने ११ आठवडे नग्न पूजा केली. त्यानंतर या नराधम महाराजाने महिलेचे गैरफायदा घेत तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. अत्याचार झाल्याची प्रचिती आल्यावर महिलेने पोलिसात धाव घेतली. या घटनेने पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे एकच खळबळ उडाली आहे.

hadapasar police station
चंद्रकांत पाटलांना साडी, बांगड्यांचा आहेर; पाचोऱ्यात निषेध

दरम्यान, पीडित महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत नराधम महाराजावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुण्याचा मांजरीत खळबळ उडाली आहे. या आरोपी महाराजाचे धंनजय गोहाड उर्फ नाना असे नाव आहे. तसेच या महाराजाचे वय ६० वर्ष आहे. महिलेच्या आरोपानुसार पोलिसांनी महाराजावर बलात्कारासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष आघोरी प्रथा या कलमान्वे हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. भोंदू बाबावर कारवाई करण्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com