Pune Airport : पुणे विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची चोरी; अनेकांच्या तक्रारी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pune Crime News : पुणे विमानतळावर प्रवाशांच्या बॅगेतून मौल्यवान वस्तू चोरीला जात असल्याची घटना समोर आली आहे.
Pune Airport Crime
Pune Airport Crime Saam TV

Pune Crime News : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे विमानतळावर प्रवाशांच्या बॅगेतून मौल्यवान वस्तू चोरीला जात असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेसंदर्भात काही प्रवाशांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे विमानाने प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे सामान खरचं सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Maharashtra Breaking News)

Pune Airport Crime
Beed News : खेळता-खेळता शेततळ्यातील पाण्यात उतरले; एकाच कुटुंबातील तिघेही बुडाले, हृदयद्रावक घटना

विशेष बाब म्हणजे, यापूर्वी देखील पुणे विमानतळावर बॅगेमधील मौल्यवान वस्तू चोरीला जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. आता पुन्हा एकदा चोरीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांच्या सामनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 19 मार्च रोजी पुणे विमानतळावर उतरलेले विदेशी प्रवासी जॉर्ज पॉल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मी आज (19 मार्च) पुणे विमानतळावर उतरलो. माझे सामान घेण्यासाठी गेलो असता, माझ्या बॅगचे लॉक खराब करण्यात आल्याचे माझ्या निदर्शनात आले".

"बॅगमधील सामान सुद्धा व्यवस्थित नव्हते. याबाबत मी एअरलाईन्स कर्मचार्‍यांकडे तक्रार केली. तेव्हा त्यांनी मला लगेच 700 रुपयांचे व्हाउचर ऑफर केले. पण जे घडलं ते योग्य नाही, कारण दोन दिवसांनी मला पुणे विमानतळावरून पुन्हा प्रवास करायचा आहे.” दरम्यान, इंडिगो एअरलाइन्सने पॉल यांच्या या ट्विटची दखल घेतली. तुमच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. या घटनेचा तपास करण्यासाठी आम्हाला योग्य वेळ द्या, आम्ही तुम्हाला याबाबतचे अपडेट कळवू, असं इंडिगो एअरलाइन्सने म्हटलं आहे.

विशेष बाब म्हणजे, पुणे विमानतळावर 19 मार्च रोजी अशाच प्रकारची एक दुसरी घटना घडली. एका महिलेने स्पाईसजेटने दुबई ते पुणे असा प्रवास केला. या महिलेने सुद्धा आपल्या बॅगेतील मोल्यवान वस्तू तसेच काही पैसे चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. याबाबतची तक्रार महिलने केली आहे. "पुणे विमानतळावर काम करणारे कर्मचारी प्रवाशांचे सामान स्कॅन करण्याच्या नावाखाली लूट करत आहेत. माझ्यासोबत असंच घडलं आहे, तुम्ही कबरेपर्यंत पोहोचेपर्यंत तुमचे जीवन संकटांनी भरलेले असेल...” अशी पोस्ट या महिलेने केली आहे.

Pune Airport Crime
Crime News: जन्मदात्या आईनेच चिरला ३ महिन्यांच्या चिमुकलीचा गळा; नाशकातील क्रूर घटनेचा २४ तासांत छडा

इतकंच नाही तर विपुल आळेकर नामक एका व्यक्तीने सुद्धा विमातळावरुन आपल्या बॅगेतील काही सामान चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. “काही महिन्यांपूर्वी मी दिल्ली ते पुणे प्रवास केला, तेव्हा माझ्या दोन सामानाच्या बॅगचे कुलूप तुटले होते आणि बॅगांमधून माझ्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. हे योग्य नाही आणि विमान कंपन्यांनी ग्राउंड स्टाफवर कठोर कारवाई केली पाहिजे.” अशी मागणी आळेकर यांनी केली.

दरम्यान,भारतीय विमानतळ प्राधिकरण पुणेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “आम्ही दररोज एअरलाइन्सच्या कामकाजावर लक्ष ठेवतो आणि पाहतो पण सामान तुटण्याच्या आणि चोरीच्या या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातात. या एअरलाइन्सच्या ग्राउंड स्टाफला कडक सूचना दिल्या जातात. तरीही, प्रवाशांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.”

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com