पुण्यात खळबळ; तळजाईच्या जंगलात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

पुणे जिल्ह्यातील तळजाईच्या जंगलात हादरवणारी घटना घडली आहे. तळजाईच्या जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
pune crime news unknown man dead body found in taljai forest pune
pune crime news unknown man dead body found in taljai forest puneSaam Tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : पुणे (Pune ) जिल्ह्यातील तळजाईच्या जंगलात हादरवणारी घटना घडली आहे. तळजाईच्या जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने तळजाईच्या जंगलातील आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे. जंगलात फिरणाऱ्या एक नागरिकाला हा मृतदेह आढळून आला, त्यानंतर या नागरिकाने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तीच्या मृत्यूची( Death ) नोंद केली आहे.या प्रकरणाचा पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला आहे. (Pune Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील तळजाई जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. या जंगलात फिरणाऱ्या एका नागरिकाला हा मृतदेह नजरेस आला.त्यानंतर नागरिकाने पोलिसांना कळविले. सदर घटनेची माहिती मिळताच सहकारनगर ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आढळलेल्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद केली आहे. तसेच मृतावस्थेत आढळलेल्या या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही,अशी माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील तळजाईच्या जंगलात एक नागरिक फिरत होता. त्यावेळी त्याला जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. या नागरिकास हा मृतदेह झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.सदर प्रकरणामुळं आजूबाजू्च्या वस्तीत एकच खळबळ माजली आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह दिसताच जागरूक नागरिकाने पुण्यातील सहकारनगर पोलिसांना कळविले. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू केला आहे. मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

pune crime news unknown man dead body found in taljai forest pune
एटीएम कार्ड बदलवून शेतकऱ्याची फसवणूक; ३६ हजारात गंडवले

घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आजूबाजूच्या वस्तीत जाऊन सदर मृत व्यक्तीची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे तळजाई जंगलाच्या आजूबाजूच्या वस्तीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, अनेक तास तपास करूनही अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही, अशी माहिती पुण्याचा सहकारनगर पोलिसांनी दिली आहे. तसेच या मृत व्यक्तीनं आत्महत्या केली आहे की कोणी या व्यक्तीचा घातपात झाला आहे,असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com