Pune Crime News: मध्यरात्री गावगुंडांची दहशत.. अज्ञातांकडून ४ रिक्षांची जाळपोळ; पुण्यातील संतापजनक प्रकार

Pune Latest News Update: शहरातील जनता वसाहत परिसरात अज्ञाताने चार रिक्षा जाळल्याची घटना उघडकीस आली आहे.
Pune Crime News Latest Update
Pune Crime News Latest UpdateSaamtv

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Crime News:

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. एकीकडे शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू असतानाच शहरातील जनता वसाहत परिसरात अज्ञाताने चार रिक्षा जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Pune Crime News Latest Update
Gadchiroli News : दोन कोटींचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी संजयला पत्नीसह अटक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे (Pune) शहरात गाड्यांची तोडफोड, कोयता गॅंगने दहशत माजवल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. गणपती उत्सवानिमित्त पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले जात असतानाच शहरात चार रिक्षा जाळल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील जनता वसाहत परिसरात रात्री २.३० वाजता ही घटना घडली. यामध्ये ४ रिक्षा जळून खाक झाल्या असून रिक्षा मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या रिक्षा नेमक्या कोणी आणि कशासाठी पेटवल्या याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, पुण्याप्रमाणे कोल्हापूर (Kolhapur) शहरातही मध्यरात्री गावगुंडाची दहशत पाहायला मिळाली. ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून ट्रकचालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर शहरात घडला. हातात तलवारी घेत मद्यधुंद अवस्थेत ट्रकची तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

Pune Crime News Latest Update
Car Accident: १०० फूट खोल दरीत कोसळली कार; चौघांचा मृत्यू, पर्यटनाला जाताना अपघात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com