Pune Crime News: धक्कादायक! कंपनी मालकाला धमकावून ५० लाखांच्या खंडणीची मागणी; चौघांना अटक

Pune Latest News: खंडणी न दिल्यास फिर्यादी आणि कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
Pune News
Pune NewsSaam Tv

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुण्यात कंपनीतील तीन कामगारांनी साथीदारांच्या मदतीने मालकाला धमकावून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. (Pune Latest News)

Pune News
2000 Rupee note: सरकारने किती नोटा छापल्या, बँकेत किती आणि व्यवहारात किती? सरकारने हिशोब द्यावा - जयंत पाटील

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज (Katraj) महामार्गावरील एका स्कूलजवळ पाच-सहा जणांनी सहा मे रोजी कंपनीच्या मालकाची मोटार अडवून शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच १२ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना मोबाईलवर व्हॉटसअप कॉल करुन ५० लाख रुपयांची खंडणीही मागितल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे खंडणी न दिल्यास फिर्यादी आणि कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली असून या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

Pune News
Maharashtra Politics: राज्यात शिवसेना (UBT)-संभाजी ब्रिगेड 'संयुक्त मिळावे' घेणार, समन्वय समितीच्या बैठक निर्णय

सौरभ संजय बनसोडे (वय २१, रा. रामनगर, वारजे), पवन मधुकर कांबळे (वय २२, रा. धायरी), संकेत योगेश जाधव (वय २४, रा. नऱ्हे) आणि कृष्णा भीमराव भाबट (वय १९, रा. धायरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com