Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरली, एकूण पाणीसाठा किती?
सचिन जाधव, साम टीव्ही
Pune Dam Water Level News Today: गेल्या महिनाभरापासून पुणे जिल्ह्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने शुक्रवारी जोरदार पुनरागमन केलं. शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं आहे. (Latest Marathi News)
पुणे शहराला (Pune News) खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांमध्ये सध्या ९३ टक्के (२७.१६ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात धरणांमध्ये २९.४ टीएमसी (९९.६१ टक्के) पाणीसाठा जमा झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असला, तरी जमा झालेला पाणीसाठा समाधानकारक आहे.
दरम्यान, गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभरात खडकवासला येथे १३ मिलिमीटर पानशेतमध्ये १८ मिलिमीटर, तर वरसगावात २० मिलिमीटर आणि टेमघरमध्ये २५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणात ०.९० टीएमसी म्हणजे ४५.७२ टक्के पाणीसाठा आहे. (Breaking Marathi News)
पानशेत १०.५८ टीएमसी म्हणजे ९९.४१ टक्के आहे. वरसगाव मध्ये १२.७१ टीएमसी म्हणजे ९९.१० टक्के पाणी जमा आहे.तर टेमघर धरणात २.९७ टीएमसी म्हणजे ८०.०३ टक्के पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी या चारही धरणात २७.१५ टीएमसी म्हणजे ९३.१३ टक्के इतका पाणीसाठा होता.
संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातच पाण्याअभावी पिके जळू लागल्याने बळीराजाची चिंताही वाढली होती. यातच धरणात कमी पाणीसाठा असल्याने खरीपाची एक पाणीपाळी सोडण्यासही शासनाने नकार दिला होता.
त्यामुळे बळीराजा हा पावसावरच अवलंबून होता. गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. वरसगाव आणि पानशेत धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणांमधून ६०० क्युसेक वेगाने वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.