Pune: 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद; तरुणीने घोटला प्रियकराचा गळा

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत लिव्ह इन मध्ये राहत असलेल्या तरुणीने स्वतःच्याच प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.
Pune: 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद; तरुणीने घोटला प्रियकराचा गळा
Pune: 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद; तरुणीने घोटला प्रियकराचा गळाSaam Tv

सागर आव्हाड

पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत लिव्ह इन मध्ये राहत असलेल्या तरुणीने स्वतःच्याच प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना झालेल्या ओळख झाली होती आणि दोघे एकत्र राहत होते. मात्र, त्यांच्यात काही किरकोळ गोष्टीवरून वाद होत असे आणि त्यामुळे रागाच्या भरात विद्यार्थिनीने प्रियकराचा Friend गळा दाबून खून केल्याची घटना हडपसर Hadapsar मधील भेकराई नगरमध्ये घडली आहे.

हे देखील पहा-

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात Hadapsar Police Station आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. त्यानंतर ता. ८ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी विरोधात खुनाचा Murder गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही खुनाची घटना दिनांक २९ ऑगस्टला भेकराईनगर हिंद कॉलनी येथे त्यांच्या राहत्या घरात घडली आहे. मात्र, पोलीस तपास व शवविच्छेदनाचा अहवाल आला आणि त्यानंतर त्या तरुणीने स्वतः खून केल्याची कबुली दिली आहे.

Pune: 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद; तरुणीने घोटला प्रियकराचा गळा
राज्यातील वारकऱ्यांना मानधन देण्याचा शासनाचा विचार...

खून झालेल्या तरुणाचे नाव सोनल पुरुषोत्तम दाभाडे ( वय 34 रा. हिंद कॉलनी नर्सिंग डमाळे बिल्डिंग,भेकराईनगर, फुरसुंगी ) असे आहे. तर या खून प्रकरणी रोहिणी रामदास यूनाते ( वय 24 रा. हिंद कॉलनी नर्सिंग डमाळे बिल्डिंग,भेकराईनगर, फुरसुंगी ) हिला अटक करण्यात आली आहे. निवास पुरुषोत्तम दाभाडे ( वय 30 रा.मु. घोटा,ता.तिवसा जि. अमरावती) यांनी याबद्दल फिर्याद दिली आहे.

मागील तीन वर्षांपासून भेकराईनगर येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये;

सोनल व रोहिणी मागील तीन वर्षांपासून 3 years भेकराईनगर येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये Live in Relationship राहत होते. माहितीनुसार, दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. मात्र त्यांचे दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असे आणि असाच एक वाद 29 ऑगस्ट रोजी रोहिणीचा सोनल सोबत वाद झाला. राग अनावर झाल्याने रोहिणीने सोनलला ढकलले आणि तो भिंतीवर आपटला गेला. त्यामुळे सोनल खाली कोसळला. रोहिणीने त्याचा गळा घोटला व त्याला जीवे मारले. यानंतर सोनलचा अचानक मृत्यू Death झाला आहे अशी खोटी माहिती तिने पोलिसांना व सोनलच्या नातेवाईकांना सांगितली. त्यादरम्यान, सोनलचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी Postmortem पाठवला. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आला आणि त्यानंतर सोनलचा खून झाल्याचे उघडकीस झाले. त्यानंतर पोलिसांनी रोहिणीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com