
जुलै महिन्यात धुव्वाधार बरसणाऱ्या पावसाने संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्याकडे पाठ फिरवली. सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाने पुनरागमन केलं. मात्र, असं असलं तरी पुणे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात फक्त ५२८.६ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या केवळ ६५.७ टक्के इतके आहे.
विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात १ हजार १३.८ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. त्या तुलनेत यंदा पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. नुकतीच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने पावसाची आकडेवारी सादर करण्यात आली. (Latest Marathi News)
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षी १ जूनपासून दररोज पडणाऱ्या पावसाची नोंदणी केली जाते. यानुसार तालुकानिहाय पडलेला पाऊस, महिनानिहाय एकूण सरासरी पाऊस आणि एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात झालेला पाऊस आदींची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते.
या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. आकडेवारीनुसार, यंदाच्या पावसाळ्यात (Pune Rain News) आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील फक्त मावळ आणि आंबेगाव या दोनच तालुक्यात त्या तालुक्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. याशिवाय भोर, वेल्हे आणि खेड हे ३ तालुके वार्षिक सरासरी पावसाच्या आसपास पोहोचले आहेत.
जिल्ह्यापाठोपाठ पुणे शहरातील (Pune News) पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. पुणे शहरात यंदाच्या पावसाळ्यात आजअखेरपर्यंत एकूण ३१६.१ मिलिमिटर पाऊस पडला आहे. यंदा शहरात आतापर्यंत पडलेल्या पावसाचे प्रमाण हे फक्त ५६.८ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात आजच्या तारखेपर्यंत पुणे शहरात एकूण ७२०.५ मिलिमीटर (१२९.४ टक्के) पाऊस पडला होता.
वरसगाव धरण: ९९.५५ टक्के
पानशेत धरण: १०० टक्के
खडकवासला धरण: ५३.१२ टक्के
पवना धरण: १०० टक्के
उजनी धरण: २२.६० टक्के
कोयना धरण: ८२.५१ टक्के
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.