पुणे : महिला नर्सच अंघोळ करताना चित्रिकरण, सुरक्षा बलाच्या गार्डला अटक, पहा Video

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात (आयबी गेस्ट हाउस) निवासी महिला परिचारिका अंघोळ करीत असताना सुरक्षारक्षकाने व्हिडिओ चित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
पुणे : महिला नर्सच अंघोळ करताना चित्रिकरण, सुरक्षा बलाच्या गार्डला अटक, पहा Video
पुणे : महिला नर्सच अंघोळ करताना चित्रिकरण, सुरक्षा बलाच्या गार्डला अटक, पहा VideoSaamTvNews

पुणे : कोरोना ड्युटी करून निवासासाठी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात (आयबी गेस्ट हाउस) आलेली परिचारिका महिला अंघोळ करीत असताना सुरक्षारक्षकाने व्हिडिओ चित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परिचारिकेच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल झाला असून, बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अशोक तुकाराम चव्हाण अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३६ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (२२ नोव्हेंबर) मध्यरात्री घडला. तक्रारदार परिचारिका या नजीकच्या सरकारी रुग्णालयात नोकरीस आहेत. महिला या सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून कर्तव्यावर आहेत.

सध्या त्यांना कोरोना ड्युटी करत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांची 'आयबी गेस्ट हाउस' येथे राहण्याची सोय केलेली आहे. सोमवारी मध्यरात्री त्या काम संपल्यानंतर गेस्ट हाउस ला गेल्या. 'करोना ड्युटी' करून आल्याने 'गेस्ट हाउस'मध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आंघोळ केली.

या ठिकाणी राहणाऱ्या परिचारिकांचा हा नित्यक्रमच आहे. तक्रारदार आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या. त्या वेळी तेथे ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीजवळ येऊन, त्यांचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढले असल्याचा आरोप महिलेने केलाय, खिडकीबाहेर कोणीतरी असल्याची शंका आल्याने तक्रारदार महिलेने बाहेर येऊन पाहणी केली. मात्र, त्यांना कोणीच दिसले नाही.

पुणे : महिला नर्सच अंघोळ करताना चित्रिकरण, सुरक्षा बलाच्या गार्डला अटक, पहा Video
Breaking : अकोल्यात ईगल कंस्ट्रक्शनच्या प्लांट मध्ये स्फोट; दोघांचा जागीच मृत्यु!

CCTV मुळे सापडला आरोपी :

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांनी तातडीने 'गेस्ट हाउसमधील त्यांच्या रुमबाहेरील परिसरातील सीसीटीव्ही तपासले, तेव्हा सुरक्षारक्षक बाथरूमजवळ आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली होती, सध्या त्याची जामिनावर सुटका झालीय.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com