Breaking : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला भीषण आग

आयआयएसईआरच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रसायन शास्त्राच्या विभागात तीन ते चार संशोधक विद्यार्थी होते.
Breaking : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला भीषण आग
Breaking : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला भीषण आग Twitter/@ANI

पुणे : महाराष्ट्रातील पुणे (Pune) येथे भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (IISER) भीषण आग लागली आहे होती. मात्र, कोणत्या कारणास्तव आग लागली. याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. आग लागल्याचे कळताच काही वेळातच पुणे महापालिका, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO), पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) अग्निशमन दलाच्या (Fire brigade0 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी दुपारी अडीच वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. (Massive fire at Indian Institute of Science Education and Research)

Breaking : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला भीषण आग
रेशन धान्याच्या मापात 'कंची'; एका पोत्यात 2 ते 3 किलो कमी धान्य

मिळालेल्या माहितीनुसार, आयआयएसईआरच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रसायन शास्त्राच्या विभागात आज दुपारी १२ वाजता ही आग लागली. यावेळी प्रयोगशाळेत तीन ते चार संशोधक विद्यार्थी होते. प्रयोग करण्यासाठी तयार केलेल्या एक्झॉस्ट चेंबरमध्ये ही आग लागली. या घटनेबाबत त्यावेळी विभागात असेलेल्या विद्यार्थ्याने माहिती दिली. एक विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाली. आग लागल्याचे दिसताच विभागातील संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आग विझवण्यासाठी तातडीने प्रयोगशाळेतील कार्बन डायऑक्साईड आणि वाळूचा वापर करत आग विझवली. यावेळी एका मुलीच्या कपड्यांवर देखील आग पेटली होती. तिला तातडीने ॲप्रॉनने गुंडाळून ती आग विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

मात्र चेंबरच्या माध्यमातून आग पसरु लागली. आग आटोक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. प्रयोगशाळेतील मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा बसवलेल्या ठिकणी एक्झॉस्ट चेंबर एकमेकाला जोडण्यात आला आहे. जेंव्हा चेंबरचा वरचा भाग पेटल्यानंतर वायरिंग, छत, वातानुकूलन यंत्रणेतील साहित्य, या वस्तुंनीदेखील पेट घेतला. तातडीने गॅस सिलींडर प्रयोगशाळेबाहेर काढण्यात आले.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com