Pune News: पुण्यात अग्नितांडव! मंगळवार पेठेत दुकांनाना मोठी आग; 8 अग्निबंब घटनास्थळी

Mangalwar Peth: पुण्यातून आगीचं मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
Pune Fire News
Pune Fire News Saam Tv

सचिन जाधव

Pune Fire News : पुण्यातून आगीचं मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवार पेठ असलेले या जुना बाजारातील वस्तूंच्या दुकानांना मोठी आग लागली आहे. बुधवारी सकाळी बाजारातील काही दुकानांना अचानक आग लागल्याची घटना घडली. दुकानांना आग लागल्यानंतर परिसरात एकच धावाधाव झाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. (Latest Marathi News)

Pune Fire News
Mumbai News : धारावी हादरली! पत्नीसमोरच पतीची सपासप वार करुन हत्या, पत्नीही जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात (Pune) बुधवारी सकाळी जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग लागल्याची घटना घडली. मंगळवार पेठ असलेले या जुना बाजारमध्ये अनेक वस्तूंची दुकान आहेत. यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक आग (Fire) लागली. आगीची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंगळवार पेठेतील या जुना बाजारात वायरिंग, इलेक्ट्रिकल, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कोणी ही जखमी झालेले नाही. मात्र, या आगीत ७ ते ८ दुकानांना मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून मोठ्या शर्थीने आग विझविण्याचे काम सुरू आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली होती याची पूर्तता झालेली नाही.

Pune Fire News
Parbhani Crime News : सख्खे शेजारी, पक्के वैरी! बदला घेण्याच्या उद्देशाने चक्क ३ वर्षाच्या चिमुकल्याला संपवलं

आगीवर अग्निशमन दलाचं नियंत्रण

मंगळवार पेठेतील या जुना बाजारातील बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच धावाधाव झाली. त्यानंतर परिसरातील लोकांनी अग्मिशमन दलाला आगीच्या घटनेची माहिती दिली.

आगीच्या घटनेची माहिती सकाळी सात वाजून अडतीस मिनिटाला कळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दलाचे आठ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनी सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटाला आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com