Pune News: "पुणे फर्स्ट" उपक्रमाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ

पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी यासाठी "पुणे फर्स्ट" हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याच्या संकेतस्थळाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला
Pune News: "पुणे फर्स्ट" उपक्रमाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ
Pune News: "पुणे फर्स्ट" उपक्रमाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ- Saam Tv

पुणे : पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी यासाठी "पुणे फर्स्ट" (Pune) हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याच्या संकेतस्थळाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या हस्ते करण्यात आला. (Pune first website launched by devendra fadanavis)

पुणे महापालिकेचे (PMC) सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी यासह आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात पुणे राज्यासह देशात अग्रेसर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा पुण्याचा देशातील सर्वात मोठे शहर क्रमांक लागतो. पुण्याबद्दलची माहिती जगभर पोहोचविण्यासाठी ‘पुणे फर्स्ट’ या उपक्रमाची सुरवता केली आहे.

पुण्याच्या विकासाचे आणि प्रगतीचे नवे मानदंड आपल्या शहराने स्थापन करावेत, गट- तट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून "पुणे फर्स्ट" या विचाराने जनतेने चर्चा करावी, संवाद करावा, तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे यासाठी व्यासपीठाचा उपयोग होईल, असे गणेश बीडकर यांनी सांगितले. www.punefirst.org या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन बीडकर यांनी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com