Pune online Education Fraud: विद्येच्या माहेरघरात कोट्यवधींचा एज्यूकेशन घोटाळा; लोन देण्याच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक

Pune Fraud News: या प्रकरणात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Fraud News
Pune Fraud NewsSaamtv

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune News: पुणे (Pune) शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र विद्येच्या माहेरघरातून एक धक्कादायक फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन कोर्समध्ये कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन एज्युकेशन घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. ज्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांची फसवणुक झाली आहे. या प्रकरणात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Pune Fraud News
Kharghar Heatstroke News : दुर्घटनेची अनेक कारणे आहेत...; खारघर दुर्घटनेप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली कारणे

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्याच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गिकलर्न, राईट प्लेस फॉर टेक्नॉलॉजी लर्निग या संस्थेवर गुन्हा दाखल केला आहे. एज्युकेशन लोन करून देऊन त्यांचे हप्त्याच्या रकमेएवढी स्कॉलरशीप म्हणून देणार असल्याचे सांगून अनेक विद्यार्थ्यांना गिकलर्न, राईट प्लेस फॉर टेक्नॉलॉजी लर्निग कोर्समध्ये प्रवेश देण्यात आला होता.

युवकांनी एज्युकेशन लोन स्वतःच्या नावावर घेतले. त्यांना जुजबी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर शिष्यवृत्तीची कोणतीही रक्कम मिळाली नाही. शेकडो विद्यार्थ्यांची लाखो रुपयांमध्ये अशी फसवणूक (Online Fruad) झाल्यामुळे हा एकूण घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Pune Fraud News
Corona Update: नागरिकांनो काळजी घ्या! गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार पार, २८ जणांचा मृत्यू

दरम्यान, पुण्यामधील जवळपास १०० हून अधिक तरुणांच्या नावावर हे दोन ते अडीच लाख रुपयांचे एज्युकेशन लोन घेण्यात आले. आता या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपनीन्यांनी तरुणांकडे तगादा लावला होता. दरम्यान, संबंधित संस्था कुठे आहे? ही संस्था कोण चालवत आहे याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ (Bharati Vidyapith) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com