Pune Fraud: बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याचे सांगत ६६ लाखांची फसवणूक... पुण्यातील धक्कादायक प्रकार; बिहारमधून आरोपी अटकेत

Pune Cyber Crime News: न्यायालयाने आरोपीला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Pune Fraud News
Pune Fraud NewsSaamtv

सचिन जाधव, प्रतिनिधी....

Pune Fraud News: एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा बोलत असल्याचे सांगत एका टोळीने कंपनीला ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत विशाल कुमार भरत मांझी (वय २१ वर्षे, रा. लकरीखुर्द, सिवान, बिहार) यास अटक केली.

Pune Fraud News
Mumbai Nagpur Highway Accident: चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात.. खासगी बस उलटली; ७-८ प्रवासी जखमी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करतात. आरोपी विशाल कुमार भरत मांझी याने फिर्यादी लेखापालास मोबाईलवर मेसेज करुन ‘मी कंपनीच्या संचालकाचा मुलगा बोलत आहे. मी एका महत्त्वाच्या बैठकीत असून, तातडीने पैसे पाठवा,’ असे सांगितले.

त्यावर लेखापालाने कंपनीच्या अकाऊंटमधून आरोपीच्या तीन बॅंक खात्यात ६६ लाख ४१ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर लेखापालाने बांधकाम व्यावसायिकाच्या मुलास फोन करून पैसे पाठविल्याचे सांगितले. परंतु त्यांनी मी पैसे मागितलेच नसल्याचा खुलासा केला.

Pune Fraud News
Satara NCP News: 'नको असलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार...' रामराजेंचा भाजप खासदारांना सूचक इशारा

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. सायबर पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला. या तपासात आरोपी बिहार राज्यातील सिवान येथील असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपीला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com