पुण्यात कधी होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा.. चला जाणून घेऊयात

पुणे शहरात यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
पुण्यात कधी होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा.. चला जाणून घेऊयात
पुण्यात कधी होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा.. चला जाणून घेऊयातSaam Tv

पुणे : शहरात यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

● श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२.३० वाजता गुरुजी तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल. येथील मंदिरातच गणपती विराजमान होणार आहे.

● श्रीमंत दगडुशेठ गणपती : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. ट्रस्टचे यंदा १२९ वे वर्ष आहे.

हे देखील पहा-

● अखिल मंडई गणपती : अखिल मंडई मंडळाचा १२८ वा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातच शारदा गजानन विराजमान होणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

● मानाचा पहिला, कसबा गणपती : मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी होणार आहे. भाविकांना हा सोहळा घरातून पाहता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.

● मानाचा दुसरा, तांबडी जोगेश्‍वरी : मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२ वाजता वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

● मानाचा तिसरा, गुरुजी तालिम : मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी १ वाजता उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली.

● मानाचा चौथा, तुळशीबाग गणपती : मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२.३० वाजता व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते होणार आहे. गणेश याग, मंत्रजागर असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी दिली.

पुण्यात कधी होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा.. चला जाणून घेऊयात
मानाच्या या पालख्यांची पायी दिंडी कोरोनामुळे रद्द

● मानाचा पाचवा, केसरीवाडा गणपती : मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. या वेळी परंपरेप्रमाणे सनईचौघडा वादन होणार असल्याची माहिती मंडळाचे अनिल संकपाळ यांनी दिली.

● अथर्वशीर्ष पठणही ऑनलाइन : यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्‍य नसल्याने ट्रस्टने कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन केले आहे. ऋषीपंचमीनिमित्त शनिवारी दि.११ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने होईल. ट्रस्टच्या फेसबुक पेज, इंस्टाग्रामयाद्वारे या उपक्रमाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

Edited By- digambar jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com