Pune : गॅंगस्टर बिश्नोईचा साथीदार संतोष जाधवच्या टोळीकडून १३ देसी कट्टे जप्त; ७ जणांना अटक

Pune Gangster Santosh Jadhav : पुणे ग्रामीण पोलीसानी १३ देसी कट्ट्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
Pune : गॅंगस्टर बिश्नोईचा साथीदार संतोष जाधवच्या टोळीकडून १३ देसी कट्टे जप्त; ७ जणांना अटक
Pune Gangster Santosh Jadhav Gang Arrested By Pune Policeगोपाळ मोटघरे

पुणे: सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणाततला मुख्य आरोपी लॉरेंस बिश्नोई याचा पुण्यातला साथीदार कुख्यात गुंड संतोष जाधव (Santosh Jadhav) याच्यावर पुणे पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. संतोष जाधवच्या पुणे (Pune) जिल्ह्यातील टोळीकडून पुणे ग्रामीण पोलीसानी १३ देसी कट्ट्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्याचबरोबर संतोष जाधव याच्या ७ सहकाऱ्यांना देखील पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. (Pune Gangster Santosh Jadhav Gang Arrested By Pune Police)

हे देखील पाहा -

संतोष जाधव याचे कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी जवळचे संबंध होते. तसेच त्याला पुणे जिल्ह्यात देखील लॉरेंस बिश्नोई गँगसाठी एक कुख्यात गँग बनवायची होती. असं पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. मात्र पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात संतोष जाधव सहभागी होता किंवा नाही? हे अजूनही पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात स्पष्ट झालेलं नाही. सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतर संतोष जाधव याने मध्यप्रदेशमध्ये मधील मंनवर गावात आपल्या एका सहकाऱ्याला देशी कट्टे खरेदी करण्यासाठी पाठविले होते. त्यानंतर संतोष जाधवचा सहकारी पुणे जिल्ह्यात देसी कट्टे घेऊन आला होता.

Pune Gangster Santosh Jadhav Gang Arrested By Pune Police
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण; आरोपी संतोष जाधवचा पोलीस चौकशीत मोठा खुलासा!

ह्या देशी कट्ट्यांच्या माध्यमातून संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राज्यातील अनेक बांधकाम व्यावसायिक, उद्योजक आणि अभिनेते यांच्याकडून खंडणी वसूल करणार होता. त्यासाठी संतोष जाधव याने पुणे जिल्ह्यात आपली एक मोठी टोळी देखील तयार केली होती. या टोळीतील जीवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात, जयेश रतिलाल बहीराम, वैभव ऊर्फ भोला शांताराम तिटकारे, रोहित विठ्ठल तिटकारे, सचिन बबन तिटकारे, जीशान इलाईबक्स मुंडे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com