Pune Crime News
Pune Crime News Saam Tv

Pune Crime News: पुण्यात हुक्का पार्लर चालवणाऱ्या दोघांना अटक, हुक्का ओढत असलेले 14 जणही ताब्यात

पुण्यातील हडपसर भागातील हुक्का पार्लर चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीये.

पुणे : पुण्यातील हडपसर भागातील हुक्का पार्लर चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीये. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यासह पोलिसांनी 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे (Pune Hadapsar Police Raid On Hukkah Parlor Arrest Two).

Pune Crime News
क्रूरतेचा कळस! मुलगी झाली म्हणून केली पत्नीची हत्या

पुण्यातील (Pune) हडपसर (Hadapsar) भागातील काळेपडळ इथल्या ड्रीम्स नाईट हॉटेलवर छापा टाकून हुक्का (Hukkah) चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक (Arrest) केली. यावेळी पोलिसांनी कारवाई करत 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) ही कारवाई केलीय.

या कारवाईत हडपसर पोलिसांनी जयदीप रामचंद्र पवार (वय 28, रा. पवार आळी, जि.प.शाळेमागे, फुरसुंगी, पुणे), अमोल पांडुरंग शेलार (वय 29, रा. हिंद कॉलनी, ढमालवाडी, फुरसुंगी, पुणे) यांना अटक केली आहे. आरोपींवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News
एकाच रात्री सहा दुकानाची चोरी प्रकरण; तिघांना अटक

यावेळी हॉटेलमध्ये 14 पुरुष हुक्का ओढत असल्याचे आढळल्याने त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान 15 हजार 200 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर आणि इतर साहित्य जप्त करून हुक्का पार्लर (Hukkah Parlor) चालवणाऱ्या दोघांना अटक केले.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com