Pune Housing Society Fine News: दाम्पत्याने घराबाहेर बसवली गणेशाची मूर्ती; सोसायटीने ठोठावला ५ लाखांचा दंड, नेमकं काय आहे प्रकरण?

Pune News: घराबाहेर गणेशाची मूर्ती बसविल्याने सोसायटीने दाम्पत्याला ५ लाख ६२ हजारांचा दंड ठोठावला आहे.
Pune News
Pune NewsSaam tv

अक्षय बडवे

Pune News: पुण्यातील एका दाम्पत्याला घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविणे चांगलंच महागात पडलं आहे. घराबाहेर गणेशाची मूर्ती बसविल्याने सोसायटीने दाम्पत्याला ५ लाख ६२ हजारांचा दंड ठोठावला आहे. पुण्यातील वानवडी येथील फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहहरचना सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)

सतीश होनावर आणि संध्या होनावर अशी दाम्पत्याची नावे आहेत. या दाम्पत्याने 2002 मध्ये वानवडी भागात फ्लॉवर व्हॅली या सोसायटीमध्ये सातव्या मजल्यावर घर खरेदी केलं होतं. घर खरेदी केल्यावर त्यांनी वास्तूशांती केली, घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली. 2005मध्ये सोसायटी रजिस्टर करण्यात आली.

Pune News
Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच; नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण

या सोसायटीने एक कुठल्याही फ्लॅट धारकाने घराच्या बाहेर शू रॅक, कुठल्याही मूर्ती, फिश टँक,फुलदाणी ठेऊ नये, असा नियम जारी केला.

दरम्यान, होनावर दाम्पत्याने कागदापासून बनविलेली गणपती बाप्पांची तीन ते साडेतीन फुटांची मूर्ती घराबाहेर ठेवली. मूर्ती घराबाहेर ठेवल्यामुळे आता या दाम्पत्याला सोसायटीने 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, हे प्रकरण थेट कोर्टात पोहचलं आहे.

सतिश होनावर सोसायटीचे सदस्य असून २०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये ते सोसायटीचे अध्यक्ष होते. माञ त्यांच्या आजारपणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 2019 साली सोसायटीवर नवीन मंडळ स्थापन झालं आणि त्यानंतर नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली.

Pune News
Nagar News : खूनी हल्ला झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-याची प्राणज्याेत मालवली, भाजप नगरसेवकासह पाच अटकेत

नव्या सोसायटी कमिटीने कुठलीही वस्तू घराबाहेर ठेवली तर शासनाच्या नियमानुसार महिन्याच्या टॅक्सच्या पाच पट रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल,असा निर्णय घेतला. त्यानंतर सोसायटीने होनावर यांना 2019 मध्ये नोटीस पाठवली. सोसायटीने दाम्पत्याला घराबाहेर बसविलेली गणपती बाप्पाची मूर्ती काढून टाका, अशा आशयाची नोटीस पाठवली.

या सोसायटीचे सेक्रेटरी कल्याण रामायण म्हणाले की, आम्ही जो निर्णय घेतला आहे.तो गणेश मूर्तीच्या विरोधात नाही. आमची देखील बाप्पावर श्रद्धा आहे. त्यांनी बाप्पाची मूर्ती ही घरात बसवावी. आमचं काहीही म्हणणं नाही'.

'आम्ही हे मानतो की आधीच्या लोकांनी कारवाई करायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. आम्ही त्यांना नोटीस तसेच दंड ठोठावला आहे, तो कायदेशीर मार्गाने ठोठावला आहे, अशी प्रतिक्रिया फ्लॉवर व्हॅली सोसायटीचे अध्यक्ष कल्याण रामायण यांनी दिली.

Pune News
MSRTC News : ॲपची निर्मती... प्रवाशांना कळणार बस कुठे आहे, किती वेळात पोहोचणार; जाणून घ्या एका क्लिकवर

गणेश मूर्तीवरून सुरू झालेला वाद हा न्यायालयात पोहचला आहे. आता या प्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे होनावर कुटुंब आणि सोसायटीचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com