
Pune School News : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळानंतर आता शिक्षण क्षेत्रात दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात तब्बल 13 शाळा बेकायदेशीरपणे सुरु असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याशिवाय ज्या 30 शाळा अनधिकृत रित्या सुरू होत्या, त्या शाळा बंद झाल्या आहे. तसा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी दिला आहे.
त्यापिकी काही शाळा (School) मूळ परवानगी ठिकाण सोडून अन्यत्र भरत होत्या. आता त्या मूळ पत्त्यावर भरत आहेत. तसेच इतर शाळांना शासनाची परवानगी / मान्यता नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई (Penal action) करण्यात आली होती.
तालुक्यात सुरू आलेल्या सर्व अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापक, व्यक्ती आणि मुख्याध्यापक यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
'त्या' १३ शाळा कोणत्या?
1) ऑर्चीड इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली
2) पुणे इंटरनॅशनल स्कूल, आष्टापुर मळा, लोणी काळभोर, तालुका हवेली
3) श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल वीर, तालुका पुरंदर (परस्पर स्थलांतर)
4) संकल्प व्हॅली स्कूल, उरवडे, तालुका मुळशी
5) एस. एन. बी. पी. टेक्नो स्कूल, बावधन, तालुका मुळशी
6) राहुल इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी, तालुका मुळशी
7) अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे/ सांगावडे, तालुका मुळशी
8) श्री साई बालाजी पब्लिक स्कूल, दत्तवाडी नेरे, तालुका मुळशी
9) श्री. मंगेश इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, अशोकनगर, लिंगाळी रोड, तालुका दौंड (परस्पर स्थलांतर)
10) क्रेयॉन्स इंग्लिश स्कूल कासूर्डी, तालुका दौंड
11) किडझी स्कूल, शालिमार चौक, दौंड
12) सुलोचना ताई झेंडे बालविकास व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी, तालुका हवेली.
13) तक्षशीला विक्रमशिला इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, किरकटवाडी, तालुका हवेली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.