मावळ हादरलं! कोयत्याने सपासप वार करून युवकाची हत्या; ७ जणांना अटक

पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या 6 साथीदारांना अटक केली.
मावळ हादरलं! कोयत्याने सपासप वार करून युवकाची हत्या; ७ जणांना अटक
Vadgaon Maval CrimeSaam Tv

मावळ : वडगाव मावळ (Vadgaon Maval) येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धारधार शस्त्राने वार करून एका युवकाचा खून करण्यात आला होता. या खूनाचा तपास लावण्यात पोलिसांना (Police) यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या 6 साथीदारांना अटक केली. किरकोळ कारणातून हा खून केल्याची कबूली आरोपींनी दिली. (Pune Vadgaon Maval Crime News)

Vadgaon Maval Crime
५ वर्ष प्रेमसंबधानंतर प्रियकराचा ऐनवेळी लग्नास नकार; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

विश्वजीत देशमुख असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तर राम विजय जाधव, आदित्य ऊर्फ सोन्या सुरेंदर चौहान अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. किरकोळ कारणावरून आरोपी व मयत विश्वजीत यांच्यात भांडणे झालेली होती. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी आणि त्याच्या 6 साथीदारांनी सोमवारी वड़गाव गाठत विश्वजीतवर तलवार तसेच कोयत्याने वार केले.

Vadgaon Maval Crime
बोपदेव घाटातील 'त्या' मृतदेहाचं गूढ उलगढलं; मुलानेच केला बापाचा खून

यामध्ये विश्वजीत देशमुख याचा जागीच मृत्यू झाला. इतकंच नाही तर, भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या विश्वजीतचा मित्र सागर इंद्रा याला सुद्धा आरोपींनी गंभीर जखमी केले. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मात्र, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आरोपीना मोठ्या शिताफीने अटक केली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com