पुण्यात बॉम्बसदृश वस्तू आढळली; बॉम्बशोध पथक दाखल

पुणे शहराजवळील मांजरी खुर्द स्मशानभुमीजवळ बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Pune Latest News
Pune Latest NewsSaam Tv

पुणे: पुणे (Pune) शहराजवळील मांजरी खुर्द स्मशानभुमीजवळ बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्मशानभुमीजवळ एका नागरीकाला पहिल्यांदा ही वस्तू दिसली. घटनास्थळी पुणे शहर पोलीस दलाचे बॉम्ब स्कॉड पथक दाखल झाले आहे.

Pune Latest News
CSMT स्थानकात ट्रेन रुळावरून घसरली; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथली आण्णासाहेब मगर विद्यालयात ही वस्तू सापडली आहे. अभिमान रोहिदास गायकवाड यांच्या ही वस्तू निदर्शनास आली. त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना याविषयी माहिती दिली. या दोघांनी लोणीकंद पोलीस (Police) स्टेशनच्या पी आय गजानन पवार यांना संपर्क करुन माहिती दिली.

Pune Latest News
धक्कादायक! गुजरातमध्ये विषारी दारू प्यायल्याने २० जणांचा मृत्यू

यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. तात्काळ बॉम्बशोध पथक दाखल झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 'याठिकाणी खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे आढळून आला आहे. ७,८ वर्षापूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे ते आता वर आलेले दिसत आहे. पोलीस आणि बॉम्ब शोध पथक तपास करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com