Pune news : पुणे प्रादेशिक विभाग महावितरण कर्जबाजारी; कृषिपंप शेतकऱ्यांनी थकवली तब्बल १२०३९ केटींची थकबाकी

सध्या चालू बिलांची थकबाकी ४ हजार १३७ कोटी रुपयांवर पोहचली आहे.
Pune news
Pune newsSaam TV

Pune news : पुणे प्रादेशिक विभागात अनेक शेतकरी आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर अशा पाचही जिल्ह्यांमध्ये भरगोस उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. यात अनेकांच्या फळबागा असल्याने कृषीपंपाचा वापरही जास्त प्रमाणात दिसून येतो. या भागातील सर्वच शेतकरी १२ ही महिने शेतात पिक घेतात. अनेकांसाठी उदनिर्वाहाचा हाच एक पर्याय आहे आणि याच शेतीवर त्यांनी बंगले, कार ( Car) अशा विविध सुख सुविधा मिळवल्या आहेत. मात्र तरी देखील यातील १२ लाख ५४ हजार कृषीपंप शेतकऱ्यांकडे ७९०२ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. (Latest Marathi News)

सध्या चालू बिलांची थकबाकी ४ हजार १३७ कोटी रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे एकूण थकबाकीचा आकडा १२०३९ कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. अशात या थकीत बिलाचा भार कमी करण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कृषीपंप धोरण २०२० मध्ये शेतकऱ्यांना अनेक सवलती दिल्या आहेत. या सवलतींचा वापर करून थकीत बिल भरण्याचे आवाहन केले आहे.

Pune news
Pune : पुणे सेक्सटॉर्शन प्रकरणी एकाला अटक, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

महावितरणावर आर्थिक संकट

शेतकऱ्यांनी वेळेवर बिल न भरल्याने याचा संपूर्ण भार महावितरणावर आला आहे. मागिल काही वर्षांत थकबाकीचे हे प्रमाण वाढलेले आहे. याने महावितरणचे सर्व आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर बिल न भरल्यास महावितरणावर असलेला कर्जाचा भार आणखीन वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहचवण्यासाठी महावितरणला वीज उत्पादकांना रोजचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे महावितरण वारंवार कृषी ( agricultural) पंप ग्राहकांना थकीत बिल भरण्याचे आवाहन करत आहेत.

Pune news
Ravikant Tupkar : शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमानी आक्रमक, पाहा सविस्तर बातमी | SAAM TYV

थकबाकी असलेल्यांना महावितरणाकडून विशेष सूट

कृषीपंप ग्राहक काही केल्या थकीत बिल भरत नसल्याने महावितरण कंपनी मार्फत प्रत्येकाला विशेष सवलत देण्यात आली आहे. यात नवीन कृषिपंप धोरण २०२० मध्ये जास्त सवलती देण्यात आल्या आहेत. ३१ मार्च २०२२ पर्यंत थकबाकी पूर्ण केली तर सरसकट ५० टक्क्यांची सवलत मिळणार आहे. तर मार्च २०२३ पर्यंतची थकबाकी भरल्यास ३० टक्क्यांची सूट मिळणार आहे. यात विलंब दंड, अतीरिक्त व्याज अशा सर्व गोष्टी माफ करण्यात आल्या आहेत.

Pune news
औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाची मोठी कारवाई; ५४ बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित

पुणे प्रादेशीक विभागातील जिल्हानिहाय थकबाकी

सोलापूरातील ३ लाख ६९ हजार कृषिपंप शेतकऱ्यांकडे चालू बिलाची १७२९ केटींची आणि आधिच्या बिलांवर ३६०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

सांगलितील २ लाख ४० हजार कृषिपंप शेतकऱ्यांकडे चालू बिलाची ५५५ केटींची आणि आधिच्या बिलांवर १०१६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

साताऱ्यातील १ लाख ८४ हजार कृषिपंप शेतकऱ्यांकडे चालू बिलाची ३८८ केटींची आणि आधिच्या बिलांवर ६१२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

कोल्हापूरातील १ लाख ४७ हजार कृषिपंप शेतकऱ्यांकडे चालू बिलाची २१९ केटींची आणि आधिच्या बिलांवर ३८८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

पुण्यातील ३ लाख १५ हजार कृषिपंप शेतकऱ्यांकडे चालू बिलाची १२४५ केटींची आणि आधिच्या बिलांवर २२९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com